WTC Final Ind vs NZ File Photo
क्रीडा

WTC Final : सामना ड्रा झाला तर काय होणार?

नामदेव कुंभार

ICC World Test Championship Final 2021 : पावासाच्या व्यत्ययामुळे विश्व कसोटी अंजिक्यपद स्पर्धेचे जवळपास तीन दिवस वाया गेले आहेत. पहिला आणि चौथा दिवस पुर्णपणे पावसामुळे वाया गेला तर अंधुक प्रकाशामुळे दुसऱ्या दिवशी 64 आणि तिसऱ्या दिवशी 76 षटकांचा खेळ झाला. कोसोटीचा निकाल उर्वरित दोन दिवसांवर आहे. पण दोन दिवसांत सामना निकाली लागण्याची शक्यता कमीच आहे. कारण, दोन संघाचे तीन डाव बाकी आहेत, अन् फक्त 196 षटकांचा खेळ बाकी आहे. त्यातच उर्वरित दोन दिवस तुरळक पावसाचा आणि अंधुक प्रकाशाचा अंदाज आहे. त्यामुळे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा सामना अनिर्नित राहण्याची शक्यता आहे. जर हा सामना अनिर्णित राहिला तर काय? विजेता कोण? हा प्रश्न क्रीडा चाहत्यांना सतावतोय.

अंतिम सामना जर बरोबरीत सुटला किंवा ड्रॉ झाला, तर अशा परिस्थितीत दोन्ही संघांना विजेते म्हणून घोषित करण्यात येईल, असा नियम आयसीसीनं केलेला आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद सामन्यापूर्वीच आयसीसीनं काही नियमांत बदल केले होते. त्यामध्ये याचाही समावेश होता. आता उर्वरित दोन दिवसांत प्रत्येकी 98 षटकांप्रमाणे जास्तित जास्त 196 षटकांचा खेळ बाकी आहे. या षटकांत कसोटी निकाली न ठरल्यास भारत आणि न्यूझीलंड यांना संयुक्त विजेतेपद देण्यात येणार आहे.

कोणाला किती बक्षीस मिळणार?

जो संघ फायनलमध्ये बाजी मारेल त्या संघाला 1.6 मिलीयन डॉलर म्हणजेच 11.71 कोटी रुपये मिळणार आहेत. एवढेच नाही तर स्पर्धेतील उपविजेत्याला म्हणजे पराभूत संघालाही 8 लाख डॉलर म्हणजे जवळपास 5.8 कोटी रुपये दिले जाणार आहेत. आयसीसीच्या नियमावलीनुसार, जर मेगा फायनलचा सामना ड्रॉ झाला तर विजेतेपद हे संयुक्तपणे दिले जाईल. बक्षिसाची रक्कमही विभागून दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Shortage : सिलिंडर मिळणे कठीण! इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगड्या वापरा, मोदी सरकारचे जनतेला आवाहन

Chhatrapati Sambhajinagar News: एमएचटी सीईटी २०२६ नोंदणीसाठी अखेरची संधी; १९-२० मार्चपर्यंत मुदतवाढ

Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट ! पुढील ४८ तास धोक्याचे, २१ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक; राष्ट्रवादीकडून कोणाला संधी? राजकीय वर्तुळात उत्सुकता

Mahalakshmi Temple: भुईंजच्या महालक्ष्मी मंदिरात निसर्गाचा चमत्कार; सूर्यकिरणांच्‍या अभिषेकाने तेजाळली मूर्ती, काय आहे पाैराणिक महत्व!

SCROLL FOR NEXT