Sri Lanka Vs Bangladesh match in Delhi be cancelled due to air pollution Esakal
क्रीडा

SL Vs BAN : दिल्लीतील प्रदूषणामुळे श्रीलंका-बांगलादेश सामना रद्द? फुप्फुसरोग तज्ज्ञांचा ICC ला मोठा सल्ला

वायू प्रदूषणाने रद्द होणार आहे दिल्लीमध्ये खेळ, तज्ज्ञांचा आयसीसीला सल्ला...

Kiran Mahanavar

Sri Lanka Vs Bangladesh match in Delhi be cancelled due to air pollution :

नवी दिल्लीत आज एकदिवसीय विश्‍वकरंडकाचा अखेरचा सामना होणार आहे. मात्र बांगलादेश - श्रीलंका यांच्यामधील या सामन्यावर वायू प्रदूषणाचे सावट आहे. त्यामुळे श्रीलंका-बांगलादेश सामना रद्द केल्या जाऊ शकतो,

पण ही लढत नियोजित वेळापत्रकानुसार व्हावी यासाठी आयसीसीकडून फुप्फुसरोग तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला आहे. त्यानुसार उपायोजना करण्यात येत आहे. हा सामना खेळवायचा की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय आज (ता. ६) घेण्यात येणार आहे.

नवी दिल्लीमध्ये मागील चार दिवसांपासून विषारी धुक्याचा दाट थर पसरला आहे. हवेची गुणवत्ता किमान मंगळवारपर्यंत गंभीर श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. फुप्फुसरोग तज्ज्ञ रणदीप गुलेरिया यांचा सल्ल्यानुसार धोकादायक वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये पाणी शिंपडणे आणि एअर प्युरिफायर जोडणे यासारख्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आयसीसीकडून उचलण्यात आलेल्या या पावलांमुळे लगतच्या परिसरात प्रदूषणाची पातळी कमी होण्यास मदत झाली आहे.

दोन्ही देशांचे सराव सत्र

श्रीलंका व बांगलादेश या दोन्ही देशांनी प्रत्येकी एक सराव सत्र रद्द केले. बांगलादेशच्या खेळाडूंनी शुक्रवारचे तर श्रीलंकन खेळाडूंनी शनिवारचे सत्र रद्द केले. मात्र श्रीलंकन खेळाडूंनी शनिवारी इनडोअरमध्ये सराव केला. बांगलादेशच्या खेळाडूंनी मास्क घालून शनिवारी संध्याकाळी व रविवारी दुपारी सराव केला.

याआधीही घडलीय घटना

नवी दिल्ली वायू प्रदुषणामुळे सामना रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण याआधीही नवी दिल्लीतील सामन्यांवर वायू प्रदुषणाचे सावट निर्माण झाले होते. भारत - श्रीलंका यांच्यामध्ये २०१७मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात अशाच प्रकारची स्थिती निर्माण झाली होती. श्रीलंकन खेळाडू मास्क घालून या कसोटीत खेळले. त्यांच्या शरीरावरही परिणाम झाला. त्यांना उलट्या होत होत्या. त्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंना २०१९मध्ये झालेल्या टी-२० सामन्यात अशाच स्थितीचा सामना करावा लागला होता.

प्रतिष्ठा राखण्यासाठी मैदानात उतरणार

श्रीलंका व बांगलादेश यांना आता बाद फेरीची संधी नाही. श्रीलंकन संघाने सात सामन्यांमधून चार गुण, तर बांगलादेश संघाने सात सामन्यांमधून दोन गुण मिळवले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांना उपांत्य फेरीत पोहोचता येणार नाही. पण तरीही मायदेशी रवाना होण्यापूर्वी प्रतिष्ठा राखता यावी यासाठी दोन्ही देश विजयासाठी प्रयत्न करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : विदर्भाचा अभिमान! नागपूरमध्ये मारबत उत्सवाला सुरुवात, काळ्या-पिवळ्या मारबतींच्या भेटीची उत्सुकता

SCROLL FOR NEXT