world athletics championships schedule events times budapest sakal
क्रीडा

World Athletics Championships : जागतिक ॲथलेटिक्सचा रणसंग्राम आजपासून

कामगिरीत सुधारणा करण्याच्या भारतीयांकडून अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा

बुडापेस्ट : एखादा-दुसरा अपवाद वगळल्यास भारतीय ॲथलिट्‍सची नोंद जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत घेतली जात नव्हती; शनिवारपासून बुडापेस्ट (हंगेरी) येथे सुरू होत असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेतील स्थिती वेगळी आहे. पदकासाठी तमाम भारतीयांच्या नजरा भालाफेकीत नीरज चोप्रावर जरी असल्या, तरी यावेळी किमान सात-आठ खेळाडू अंतिम फेरी गाठून पहिल्या आठ क्रमांकात स्थान मिळवतील, अशी अपेक्षा आहे.

गेल्या वर्षीच्या स्पर्धेत नीरजने रौप्यपदक जिंकले होते. त्यामुळे साहजिकच त्याच्याकडून पदकाचीच अपेक्षा राहणार आहे. मात्र, राष्ट्रकुल रौप्यपदक विजेता अविनाश साबळे हासुद्धा पदकाच्या शर्यतीत आहे. गेल्या दीड वर्षापासून अमेरिकेत सराव करणाऱ्या अविनाशची सर्वोत्तम वेळ ८ मिनिटे ११.२० सेकंद असल्याने तो यापेक्षा वेगवान वेळ देईल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. ही स्पर्धा म्हणजे एकप्रकारे भारतीय ॲथलिटसाठी पॅरिस ऑलिंपिकची रंगीत तालीम होय.

लांब उडीत जेस्विन अल्ड्रीन व श्रीशंकर मुरली हे दोघे अपेक्षित कामगिरी करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कारण स्पर्धेसाठी जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने प्रसिद्ध केलेल्या लांब उडीच्या वार्तापत्राची सुरुवातच या दोघांच्या दावेदारीने केली आहे. राष्ट्रकुल रौप्यपदक विजेता असलेला श्रीशंकर गेल्या वेळी सातव्या स्थानावर होता.

यंदा दोन डायमंड लीगचा अनुभवही त्याच्या पाठीशी आहे. जेस्विनने ८.४२ आणि श्रीशंकरने ८.४१ मीटर ही आपली सर्वोत्तम कामगिरी पार केली, तर ते निश्चितच पदकाच्या नजीक जाऊ शकतात. या दोघांपुढे ऑलिंपिक विजेता मिल्टिडियस टेन्टग्लू, तायपईचा लीन टँग, जमैकाचा कॅरी मॅक्लोड, वायने पिनॉक व माजी विजेता तजय गायले आणि स्वित्झर्लंडचा सिमोन इहॅमर यांचे आव्हान असेल.

पहिल्या दिवशी भारताचा सहभाग

  • २० किलोमीटर चालणे (अंतिम) दुपारी १२.४० (परमजित सिंग, अक्षदीप सिंग, विकाश सिंग

  • ३००० स्टीपलचेस (प्राथमिक फेरी) दुपारी ३.०५ (अविनाश साबळे - पहिली हीट)

  • लांब उडी (पात्रता फेरी) दुपारी ३.५५ (शैली सिंग - ब ग्रुप)

  • १५०० मीटर रात्री १०.३२ (अजय कुमार सरोज - तिसरी हीट)

  • तिहेरी उडी रात्री ११.०५ (अब्दुला अबुबकर, प्रवीण चित्रावेल, एल्‍डोस पॉल)

ज्योतीपुढे आव्हान

गेल्या दोन वर्षात ज्योती यराजीने हर्डल्स शर्यतीत जबरदस्त कामगिरी केली. गेल्या महिन्‍यात तिने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकही जिंकले. त्यामुळे येथे ती किमान अंतिम फेरी गाठेल, असा विश्वास आहे. इतर महिलांत पारुल चौधरी, चार वर्षांपूर्वी दोहा येथे अंतिम फेरी गाठणारी भालाफेकपटू अनु राणी आणि अंजू जॉर्जची शिष्या व ज्युनिअर विश्व रौप्यपदकविजेती शैली सिंग यांचा समावेश आहे.

शैली वयाच्या २० व्या वर्षी जागतिक स्पर्धेत सहभागी होत असून अंजूचा ६.८३ मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडायचा, हे आपले प्रथम ध्येय असल्याचे तिने बोलून दाखवले आहे. यंदा ६.७६ मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी केली असून या कामगिरीची पुनरावृत्ती तिने केली, तर तिची अंतिम फेरी निश्चित आहे. दरम्यान, भालाफेकपटू किशोर जेनाला अखेर व्हिसा मिळाला असून तो बुडापेस्टसाठी रवाना होत आहे. त्यामुळे आता भालाफेकीत भारताचे तीन खेळाडू सहभागी होतील.

जागतिक ॲथलेटिक्स

तारीख ः १९ ते २७ ऑगस्ट

स्थळ ः नॅशनल ॲथलेटिक्स सेंटर, बुडापेस्ट (हंगेरी)

एकूण इव्हेंट ः ४९

एकूण सहभागी देश ः पुरुष १७७, महिला १२८.

एकूण सहभागी खेळाडू ः पुरुष ११०६, महिला १०१९

भारतात थेट प्रक्षेपण ः सोनी स्पोर्ट्स, सोनी लिव ॲप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT