World Cup 2023 closing Ceremony  esakal
क्रीडा

World Cup 2023 Final : बीसीसीआयची शांतीत क्रांती, गाजावाजा न करता वर्ल्डकपच्या सांगता समारंभाची तयारी?

अनिरुद्ध संकपाळ

World Cup 2023 Final Closing Ceremony : भारताने न्यूझीलंडचा पराभव करत वनडे वर्ल्डकपची चौथ्यांदा फायनल गाठली आहे. ही फायनल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. या सामन्याला अवघे तीन दिवस राहिले असताना अजून सांगता समारंभाबाबत बीसीसीआय किंवा आयसीसी कडून कोणतीच माहिती प्रसिद्ध करण्यात आली नव्हती.

मात्र बीसीसीआय शांतीत क्रांती करत असून नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोणताही गाजावाजा न करत सांगता समारंभाची तयारी सुरू केली आहे. 19 नोव्हेंबरला स्टेडियमवरील चाहत्यांसाठी एरियल शोचे आयोजन करण्याचं प्लॅनिंग सुरू आहे. याचबरोबर स्थानिक डान्सर देखील सांगता समारंभाची स्टेडियममध्येच तयारी करत आहेत.

वर्ल्डकप 2023 चा सांगता समारंभ होणार?

भारतातील वनडे वर्ल्डकपमध्ये उद्घाटन सोहळा झाला नव्हता. त्याच्या बीसीसीआय आणि आयसीसीने ऐवजी 14 ऑक्टोबरला झालेल्या भारत - पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वी आणि मध्यांतराला कार्यक्रम ठेवण्यात आले होते.

याचप्रमाणे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सांगता समारंभाबाबत देखील कोणताही माहिती समोर आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर सांगता समारंभाची तयारी सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहेत. दोन जेट विमानं नरेंद्र मोदी स्टेडियमवरून उड्डाण करताना दिसले होते. त्यामुळे चाहत्यांनी एअर शो होणार का अशी चर्चा सुरू केली आहे.

फायलनमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण अफ्रिकेविरूद्ध खेळणार आहे. भारताने पहिल्या सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत फायनल गाठली. भारताचा हा या वर्ल्डकपमधील सलग 10 वा विजय होता.

भारताने 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर 10 वर्षे झाली भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. यंदा हा दुष्काळ संपवण्याची नामी संधी आहे. भारत वर्ल्डकप ट्रॉफीपासून फक्त एक पाऊल दूर आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashi Tharoor: भारत समिटमध्ये 115 परदेशी वक्त्यांना प्रवेश नाकारला; शशी थरूर यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

IND vs NZ 4th ODI: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये Unplayable Deliveries असं काही नसतं, फलंदाजानं...; ८९ ऑल आऊटनंतर गौतम गंभीरकडून कानउघडणी

Thane Water Cut: ठाण्यात पुन्हा पाण्याचा ठणठणाट! सोमवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; कोणत्या भागांना फटका?

वर्षा उसगांवकर यांचे पती कोण आहेत? सोशल मीडियावर एकही एकत्र फोटो का पोस्ट करत नाहीत? अभिनेत्रीने सांगितलं कारण!

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मिठी नदीजवळ नाल्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT