World Cup 2023 kl rahul century in 62 deliveries breaks rohit sharma record of fastest century  
क्रीडा

World Cup 2023 : केएल राहुलने ठोकलं सर्वात वेगवान शतक! मोडला रोहित शर्माचा विक्रम

केएल राहुलने वर्ल्ड कप-2023 मध्ये नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले आहे

रोहित कणसे

World Cup 2023 : सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. यादमम्यान टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलने वर्ल्ड कप-2023 मध्ये नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले. राहुलने 64 चेंडूत 102 धावा केल्या.

राहुलने कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला असून तो विश्वचषकात भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 62 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यापूर्वी रोहित शर्माने याच विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध 63 चेंडूत शतक झळकावले होते.

केएल राहुलचे या विश्वचषकातील पहिले शतक आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 97 धावांची नाबाद खेळी खेळली होती. राहुलशिवाय श्रेयस अय्यरनेही शतक झळकावले. त्याने 94 चेंडूत 128 धावा केल्या तसेच तो नाबाद देखील राहिला. राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यात चौथ्या विकेटसाठी 208 धावांची भागीदारी झाली. विश्वचषकाच्या इतिहासातील चौथ्या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी आहे. राहुल आणि अय्यरच्या खेळीमुळे टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 4 गडी गमावून 410 धावा केल्या.

वर्ल्डकप-2023 च्या लीग टप्प्यातील हा शेवटचा सामना असून हा केवळ औपचारिकता म्हणून खेळला जात आहे. टीम इंडिया आधीच उपांत्य फेरीत पोहोचली आहे. भारतीय संधाचे 16 गुण असून संघाने अद्याप एकही सामना गमावला नाहीये. भारताने हा सामना जिंकला तर सलग 9 विजय नोंदवून संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल. या विश्वचषकात टीम इंडियाचे फलंदाज दमदार फॉर्ममध्ये आहेत.

या सामन्यात राहुल आणि अय्यरने शतके झळकावली. रोहितने अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावले होते. कोहलीने या विश्वचषकात दोन शतके झळकावली आहेत. या विश्वचषकातही त्याच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. कोहलीने 9 सामन्यात 594 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर रोहित शर्माच्या नावावर 9 सामन्यात 503 धावा आहेत. अय्यरने 9 सामन्यात 421 धावा केल्या आहेत तर राहुलच्या तेवढ्याच सामन्यात 347 धावा आहेत.

विश्वचषकात भारतासाठी सर्वात जलद शतक

केएल राहुल (62 चेंडू) विरुद्ध नेदरलँड्स, 2023

रोहित शर्मा (63 चेंडू) विरुद्ध अफगाणिस्तान, 2023

वीरेंद्र सेहवाग (81 चेंडू) विरुद्ध बर्म्युडा, 2007

विराट कोहली (83 चेंडू) विरुद्ध बांगलादेश, 2011

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT