World Cup 2023 Pakistan Cricket Team esakal
क्रीडा

World Cup 2023 : तब्बल 7 वर्षांनी पाकिस्तानी संघ भारतात झाला दाखल; स्वागत पाहून शेजारी भावूक

अनिरुद्ध संकपाळ

World Cup 2023 Pakistan Cricket Team : आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरू होत आहे. वर्ल्डकप खेळण्यासाठी गुरूवारी पाकिस्तानचा संघ भारतात दाखल झाला. तब्बल 7 वर्षानंतर पाकिस्तानचा संघ भारतात दाखल होत आहे त्यामुळे त्यांचे भारतात जंगी स्वागत करण्यात आले. पाकिस्तान संघाला पाहण्यासाठी विमानतळापासून हॉटेलपर्यंत क्रिकेट चाहत्यांनी गर्दी दिसली.

पीसीबीने व्हिडिओ केला शेअर

पाकिस्तान संघाचे भारतात झालेले ग्रँड वेलकम पाहून पीसीबी देखील खूष झाली. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत पाकिस्तानी संघ विमानतळावरून बाहेर येते त्यावेळी अनेक लोक पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या स्वागताला उभे असतात. कडक सुरक्षा व्यवस्थेत पाकिस्तानचे क्रिकेटपटू विमानतळावरून बाहेर पडतात. त्यानंतर संघ हॉटेलकडे जाण्यासाठी रवाना झाला. त्यावेळी रस्त्यावर देखील क्रिकेट चाहते उभे असलेले दिसले. यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपूट आश्चर्यचकित आणि काहीसे भावूक देखील झाले.

हॉटेलमध्येही जंगी स्वागत

पाकिस्तानी संघाचे विमानतळ, रस्त्यावर जंगी स्वागत झाल्यानंतर खेळाडू हॉटेलमध्ये पोहचले. तेथेही त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आळे. हॉटेल स्टाफने प्रत्येक खेळाडूच्या गळ्यात भगवी शाल घालून स्वागत केले. हॉटेलमधील स्टाफने देखील पाकिस्तानी क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी गर्दी केली होती.

पाकिस्तानी संघ 7 वर्षांनी भारतात दाखल झाला आहे. यापूर्वी 2016 चा टी 20 वर्ल्डकप खेळण्यासाठी पाकिस्तान भारतात आला होता. मात्र यानंतर ना कधी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये गेला ना कधी पाकिस्तानी संघ भारतात आला.

पाकिस्तान नेदरलँडविरूद्ध खेळून करणार मोहीम सुरू

पाकिस्तानचा संघ वर्ल्डकपमध्ये आपला पहिला सामना हा 6 ऑक्टोबरला नेदरलँडविरूद्ध खेळणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडविरूद्ध 29 सप्टेंबरला तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध 3 ऑक्टोबरला सराव सामना खेळणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT