World Cup 2023 Points Table 
क्रीडा

World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे Points Table मोठी उलथापालत! पाकिस्तान टॉप-4 मधून बाहेर तर...

Kiran Mahanavar

World Cup 2023 Points Table : आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे, तर ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत शेवटचे दोन सामने जिंकले आहेत.

20 ऑक्टोबर रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शच्या विक्रमी 259 धावांच्या भागीदारीमुळे शुक्रवारी ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सवर 367 धावांची मोठी धावसंख्या उभारली.

लक्ष्याचा पाठलाग करताना अब्दुल्ला शफीक आणि इमाम उल हक यांनीही पाकिस्तानसाठी शतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. एके काळी पाकिस्तान मजबूत स्थितीत होता पण अॅडम झाम्पाने सतत फटकेबाजी करत सामना फिरवला. अ‍ॅडम झाम्पाच्या फिरकीमुळे पाकिस्तानचा संघ 45.3 षटकांत 305 धावांवर गारद झाला.

वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानच्या सलग दोन पराभवानंतर गुणतालिकेत कमालीची उलथापालथ झाली आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला हरवून सहाव्या स्थानावरून सलग चौथे स्थान मिळवले आहे. तर पाकिस्तानचा संघ एका स्थानावर घसरला आहे. इंग्लंडची पाचव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

सलग चार सामने जिंकल्यानंतर चांगल्या नेट रनरेटमुळे न्यूझीलंडचा संघ सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. भारतानेही चार सामन्यांत चार विजय मिळवले आहेत पण नेट रनरेटमुळे ते दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या तर ऑस्ट्रेलियाने चौथ्या क्रमांकावर कब्जा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

John Cena Retired : भारतीयांचा 'लाडका' जॉन सीना निवृत्त... WWE मधील शेवटच्या लढतीत दिग्गजांच्या उपस्थितीत भावूक, Video

Brown University Firing : परीक्षेवेळी गोळीबार, शेवटचा पेपर देणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; ८ जण जखमी

Salman Ali Agha: वर्ल्डकप तिकीट विक्रीच्या पोस्टरवरून सलमानला वगळले; पाकिस्तान क्रिकेट मंडळ ‘आयसीसी’वर नाराज

Success Story: रोहित पालची स्पर्धा परीक्षेत उत्तुंग भरारी; राज्यात प्रथम, सहायक वनसंरक्षक पदावर होणार नियुक्ती

Latest Marathi News Live Update: व्होटचोरीच्या मुद्द्यावर कॉंग्रेसचे आज दिल्लीत आंदोलन

SCROLL FOR NEXT