क्रीडा

World Cup 2023 Points Table : पाकिस्तानच्या पराभवाचा टीम इंडियाला मोठा धक्का! पण बाबर सेनेचं आव्हान कायम?

Kiran Mahanavar

World Cup 2023 Points Table : एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या 26व्या सामन्यात पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेतील हा आतापर्यंतचा सर्वात रोमांचक सामना होता आणि शेवटी दक्षिण आफ्रिकेने एका विकेटने विजय मिळवला.

सलग चौथ्या सामन्यातील पराभवामुळे पाकिस्तान संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. आणि पाकिस्तानच्या या पराभवाचा धक्का टीम इंडियाला बसला आहे.

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पाकिस्तानसोबत खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 1 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह टेंबा बावुमाच्या संघाचे 2 गुण झाले, याच्या फायदा संघाला गुणतालिकेत झाला.

होय, पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर आफ्रिका आता गुणतालिकेत नंबर-1 संघ बनला आहे. त्याच वेळी, भारताने आपले नंबर-1 स्थान गमावले आणि ते दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.

आता टॉप-4 बद्दल बोलायचे झाले तर दक्षिण आफ्रिका आणि भारत प्रत्येकी 10 गुणांसह पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. त्याचवेळी न्यूझीलंड 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया 6 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानला गुणतालिकेत कोणतेही नुकसान झाले नाही, कारण यापूर्वी देखील ते 4 गुणांसह 6 व्या स्थानावर होते आणि अजूनही 6 व्या स्थानावर आहे.

मात्र आता या संघासाठी पुढचा प्रवास कठीण झाला आहे. आफ्रिकन संघाकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास जवळपास अशक्यच दिसत आहे.

कारण, बाबर अँड कंपनीने पुढचे उरलेले 3 सामने मोठ्या फरकाने जिंकले तरी त्यांना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या पराभवाची प्रार्थना करावी लागणार आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा सलग चौथा सामना ज्या प्रकारे पराभूत होत आहे, त्यामुळे पुढील सामन्यांमध्येही पाकिस्तानसाठी विजय सोपा होणार नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT