भारताविनाच जागतिक कुमार कबड्डी स्पर्धा सुरु झाली आहे
भारताविनाच जागतिक कुमार कबड्डी स्पर्धा सुरु झाली आहे 
क्रीडा

जागतिक कुमार कबड्डी अखेर भारताविना सुरू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जागतिक कुमार कबड्डी स्पर्धा अखेर भारताच्या सहभागाविना इराणमध्ये सुरू झाली. पाकिस्तानचा या स्पर्धेत सहभाग आहे, पण आशियाई कबड्डीतही लक्षणीय कामगिरी करीत असलेले दक्षिण कोरिया या स्पर्धेत नाहीत.

या स्पर्धेचे यजमान असलेल्या इराण कबड्डी महासंघाच्या संकेतस्थळावरील स्पर्धा कार्यक्रमानुसार तुर्कमेनिस्तान, मलेशिया, श्रीलंका, इराक, बांगलादेश, अफगाणिस्तान, थायलंड, इराण, पाकिस्तान, अझरबैझान, तैवान या आशियाई देशांचा सहभाग आहे. केनिया, डेन्मार्क हेच आशियाबाहेरील संघ आहेत.

प्रत्येक आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत खेळास ऑलिंपिकमध्ये नेण्याची चर्चा होते. तेच या स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यातही सांगण्यात आले. मात्र, त्याचवेळी इराण कबड्डी महासंघाच्या प्रमुखांनी आम्हाला आशियात व्यावसायिक कबड्डी लीग सुरू करायची आहे, असे सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर इराण जणू भारताविना आम्ही कबड्डी स्पर्धा घेऊ शकतो हेच अधोरेखित करीत होते. त्यामुळे लवकरच युरोप आणि आफ्रिकेत विश्‍वकरंडक स्पर्धा घेण्याचा विचार असल्याचेही सांगितले.

दरम्यान, या स्पर्धेच्या संयोजनाचा खर्च खूपच वाढला आहे. भविष्यात ही चूक टाळण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावे लागतील, असेही इराण कबड्डी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर स्पर्धा संयोजनावर पूर्ण लक्ष केंद्रित झाल्याने शिबिराकडे दुर्लक्ष झाल्याचीही टिप्पणी केल्याचे वृत्त आहे.

भारत पाक होते एकाच गटात
विश्‍वकरंडक कुमार कबड्डीत 16 संघ सहभागी होतील, अशी संयोजकांची अपेक्षा होती. त्यानुसार त्यांनी गटवारीही केली होती. या गटवारीनुसार भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात स्थान देताना त्यात इराक आणि थायलंडला स्थान दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' चा फर्स्ट लूक आऊट; जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत 'हा'अभिनेता

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SCROLL FOR NEXT