Chess World Cup 2023 Final Magnus Carlsen  esakal
क्रीडा

Chess World Cup 2023 : कार्लसनच ठरला 64 घरांचा राजा; मात्र 18 वर्षाच्या प्रग्नानंदने चांगलेच झुंजवले

अनिरुद्ध संकपाळ

Chess World Cup 2023 Final : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनने 18 वर्षाच्या प्रग्नानंदचा रॅपिड फायरच्या पहिल्या गेममध्ये पराभूत करत वर्ल्डकपवर नाव कोरले. कार्लसनने पहिल्यांदाच वर्ल्डकपवर नाव कोरले. विशेष म्हणजे कार्लसनने पहिल्यांदाच वर्ल्डकपवर नाव कोरले. (Magnus Carlsen Defeat R Pragganandhaa)

भारताच्या प्रग्नानंदसाठी यंदाचा वर्ल्डकप हा खूप चांगला गेला. त्याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या हिकारू नाकामुरा आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या फॅबिआनो कारुआनाचा पराभव केला होता. प्रग्नानंदने कार्लसनला देखील पहिले दोन क्लासिक गेम ड्रॉ करत कडवी झुंज दिली होती.

मात्र टाय ब्रेकरमध्ये कार्लसनने पहिला गेम जिंकला आणि दुसरा गेम ड्रॉ केली. यामुळे कार्लसनचा 1.5 - 0.5 असा विजय झाला.

बुद्धीबळ विश्वचषक 2023 मधील टाय ब्रेकर सामन्यात प्रग्नानंदने आक्रमक चाली रचत धडाक्यात सुरूवात केली. मात्र पिछाडीवर पडलेल्या कार्लसनने आपला अनुभव पणाला लावला. 25 मिनिटाच्या पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी आपले वजीर गमावला होता. प्रग्नानंद 19 मिनिटांपर्यंत पोहचला होता तर कार्लसन हा 14 मिनिटापर्यंत होता. कार्लसन हा पिछाडवीर गेला होता. यानंतर दोघांनीही 18 व्या चालीनंतर आपली क्वीन गमावली.

प्रग्नानंदने 25 व्या चालीपर्यंत आपली स्थिती सुधारली होती. आता त्यांच्याकडे फक्त 5 मिनिटे शिल्लक होती. पहिला टाय ब्रेकर गेम हा खूप टाईट झाला. 34 व्या चालीनंतर दोघांनीही आपला हत्ती गमावला होता. प्रग्नानंदच्या हातून वेळ निसटून चालली होती. अखेर पहिला रॅपिड गेम कार्लसनने जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये दोघांनीही आक्रमक चाली रचल्या. दोघांचेही 10 चालीनंतर आपले घोडे गमावले होते. 14 व्या चालीपर्यंत कार्लसन चांगल्या स्थितीत होता. त्यानंतर दोघांनीही 18 व्या चालीत आपापल्या क्वीन गमावल्या. अखेर दुसरा गेम ड्रॉ झाला. कार्लसनने पहिल्यांदाच वर्ल्डकपवर आपले नाव करत 18 वर्षाच्या प्रग्नानंदची झुंज 1.5 - 0.5 अशी मोडून काढली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar: मूळ टार्गेट वेगळं होतं, आयुष कोमकरला कसं संपवलं? गुन्हेगारांचा संपूर्ण प्लॅन समोर, पुणे पोलिसांनी काय सांगितलं?

Nagpur Railway Update : विदर्भ आणि पंचवेली एक्स्प्रेसला नवीन थांबे, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय

Latest Marathi News Updates: मुसळधार पावसामुळे धामणी धरण ओव्हरफ्लो, जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koregaon News: 'कोरेगावात नवीन पाच बसचे लोकार्पण'; आगारात मान्यवरांच्या हस्ते पूजन, प्रवाशांसाठी दळणवळण सेवा सुलभ

Education News : दीडशे कोटींच्या थकबाकीने शिक्षक हैराण; सेवानिवृत्त व रात्रशाळा शिक्षकांवर आली उपासमारीची वेळ

SCROLL FOR NEXT