Anshu Malik sakal
क्रीडा

Anshu Malik : कुस्तीपटू अंशू मलिकला रौप्यपदकावर समाधान

बुडापेस्ट रँकिंग कुस्ती स्पर्धेत ५७ किलो गटात भारताची अनुभवी मल्ल अंशू मलिक चीनच्या २१ वर्षीय केझिन हाँग हिच्याकडून एकतर्फी पराभूत झाली. परिणामी तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

सकाळ वृत्तसेवा

बुडापेस्ट : बुडापेस्ट रँकिंग कुस्ती स्पर्धेत ५७ किलो गटात भारताची अनुभवी मल्ल अंशू मलिक चीनच्या २१ वर्षीय केझिन हाँग हिच्याकडून एकतर्फी पराभूत झाली. परिणामी तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

चीनची केझिन हाँगी ही अव्वल नंबरी कुस्तीपटू आहे. हाँगचौऊ येथे झालेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत तिने ब्राँझ पदके जिंकलेले आहे. आजच्या अंतिम सामन्यात मात्र अंशू तिला आव्हान देऊ शकली नाही. १-१२ अशा फरकाने अंशूचा पराभव झाला.

महिलांच्या ५३ किलो गटात अंतिम पंघाल हिलाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले; तर ५० किलो गटात विनेश फोगाटचा चीनच्या जियांग झाऊ हिच्याकडून उपांत्यपूर्व फेरीत ०-५ असा पराभव झाला.

अंशूने त्याअगोदर अनास्तासिया निचिता हिचा ६-५ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर जागतिक विजेत्या झँग क्यूई हिच्यावर २-१ अशी मात करून अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे सुवर्णपदक जिंकण्याच्या आशा तिने उंचावल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT