Wrestler Vijay Chaudhary sakal
क्रीडा

Wrestler Vijay Chaudhary : कुस्तीपटू विजय चौधरीला पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह

कुस्तीचा आखाडा गाजवणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विजय नथ्थू चौधरी आता पोलिसांचे क्षेत्रही गाजवतोय. अप्पर पोलिस अधीक्षक पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलिस अधीक्षक असलेल्या विजयला कुस्तीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह’ जाहीर करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कुस्तीचा आखाडा गाजवणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विजय नथ्थू चौधरी आता पोलिसांचे क्षेत्रही गाजवतोय. अप्पर पोलिस अधीक्षक पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलिस अधीक्षक असलेल्या विजयला कुस्तीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह’ जाहीर करण्यात आले आहे.

राज्य पोलिस विभागात विविध पदांवर कार्यरत असून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान पोलिसांना महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हॅट्ट्रिक नोंदविणाऱ्या विजय चौधरीने महाराष्ट्र पोलिस दलात दोन वेळा सुवर्ण पदक जिंकले. तसेच २०२३ साली कॅनडा येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्र पोलिस दलाचे नाव उंचावले होते.

भविष्यातील मोठ्या कुस्ती स्पर्धा, तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र पोलिस दलाचे नाव असेच उंचाविण्यासाठी मी अथक परिश्रम घेणार असल्याचे विजय चौधरीने सांगितले. सध्या विजय चौधरी आपले गुरू हिंदकेसरी रोहित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदकेसरी आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT