राहुल आवारेचे आई-वडील. 
क्रीडा

राहुलच्या मूळगावी माळेवाडीत दिवाळी

अलताफ कडकाले

सोलापूर - माळेवाडी (ता. जामखेड) येथील सुपुत्र राहुल बाळासाहेब आवारे याने ५७ किलो वजनी गटात ‘फ्री स्टाइल कुस्ती’ प्रकारात आक्रमक खेळाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला कुस्तीत पहिले सुवर्णपदक मिळवून देताच त्याच्या मूळगावी म्हणजेच माळेवाडीसह जामखेड तालुक्‍यात फटाके फोडून, पेढे वाटून दिवाळीसारखाच आनंद व्यक्‍त करण्यात आला.

दुष्काळी पट्ट्यात माळेवाडी हे राहुल आवारेचे मूळ गाव आहे. येथेच त्याची वडिलोपार्जित शेती असून, आजही राहुलचे नातेवाईक येथेच राहत आहेत. राहुलचे चौथीपर्यंतचे शिक्षण माळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर आवारे कुटुंबीय पाटोदा (जि. बीड) येथे स्थायिक झाले. बाळासाहेब हेही नामांकित कुस्तीपटू. त्यांची राहुल व गोकूळ ही दोन्ही मुले कुस्तीपटू आहेत. 

बाळासाहेब म्हणाले, ‘‘घरातल्या कुस्तीच्या वातावरणामुळे राहुल तिसरीत असल्यापासून कुस्ती खेळतोय. मी स्वतःच त्याला घरीच प्रशिक्षण द्यायला सुरवात केली. जत्रांच्या वेळी फड भरतात. त्या ठिकाणी आम्ही बापलेक एकत्र जायचो. त्यातूनच तो शिकत गेला. त्याची शाळा सकाळी १० ते ४ अशी असायची. मध्ये जेवणाची सुटी मिळायची. पाटोद्यापासून ८-१० किलोमीटर अंतरावर तालीम तयार केली होती. तालीम म्हणजे अक्षरशः पत्र्याची शेड होती. राहुलने तिथेच सराव केला. आता, आमच्या घरापासून जवळ तालीम केंद्र आहे. पत्र्याच्या शेडमध्ये खेळलेल्या राहुलने मिळवलेलं यश आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.’’ 

राहुल आवारेच्या यशामुळे जामखेडसारख्या दुष्काळी तालुक्‍याचे नाव आज खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर पोचले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत राहुल आवारेने मिळविलेले यश सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
- प्रा. राम शिंदे, पालकमंत्री, नगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भीषण अपघात! भरधाव येणाऱ्या मॅजिक व्हॅनची ट्रकला धडक, नऊ मजुरांचा जागीच मृत्यू

सायली-प्रिया दोघीही आई होणार! ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्वीस्ट, प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...

Ghodegaon Accident: घोडेगाव–भीमाशंकर रस्त्यावर भीषण अपघात; समोरासमोर धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू, घोडेगाव परिसरात हळहळ..

Riyan Parag:'... तर आम्ही प्लेऑफमध्ये पोहचणार नाही', दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला रियान पराग?

राज्यातील पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी, विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक जाहीर, कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT