wriddhiman saha
wriddhiman saha 
क्रीडा

वृद्धिमान साहा दिसणार 'या' संघासाठी 'प्लेअर कम मेंटॉर'च्या भूमिकेत

Kiran Mahanavar

wriddhiman saha : भारतीय संघातून वगळण्यात आलेला यष्टिरक्षक वृद्धिमान साहा 'प्लेअर कम मेंटॉर'च्या भूमिकेत दिसू शकतो. त्याने बंगालच्या क्रिकेट असोसिएशनशी संबंध तोडले आहेत. एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे की, साहाचा क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालसोबत वादही झाला होता. साहाने अलीकडेच रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत बंगालकडून खेळण्यास नकार दिला होता.

अधिकारी म्हणाला की, साहाला त्रिपुरासाठी 'प्लेअर कम मेंटॉर'ची भूमिका करायची आहे. त्रिपुरातील सर्वोच्च परिषदेच्या काही सदस्यांशी त्यांची चर्चा सुरू आहे मात्र अद्याप काहीही ठरलेले नाही. प्रथम त्यांना CAB आणि नंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) ना-हरकत पत्र प्राप्त करावे लागेल, त्यानंतरच ही प्रक्रिया पुढे जाऊ शकते.

बंगाल क्रिकेट संघासोबतचे संबंध तोडण्याबाबत आपण मौन सोडत साहाने सांगितले. रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीसाठी बंगालच्या संघात निवड झाली असली तरी या मोसमात या संघाकडून खेळणार नाही, असे त्याने स्पष्ट केले होते.

गुजरात टायटन्सला इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची कसोटी संघात निवड झालेली नाही. पंतनंतर दुसरा यष्टिरक्षक म्हणून के एस भरतचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT