WTC Final 2023 Day 3 Ajinkya Rahane Shown Path To Team India Fight Back Team India Winning Chances
WTC Final 2023 Day 3 Ajinkya Rahane Shown Path To Team India Fight Back Team India Winning Chances  esakal
क्रीडा

WTC Final 2023 Day 3 : झुंजार अजिंक्य-शार्दुलनं दाखवून दिलं अजूनही जिंकू शकतो, मानसिकताच कळीचा मुद्दा

अनिरुद्ध संकपाळ

WTC Final 2023 Day 3 Ajinkya Rahane : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या दिवशी ज्यावेळी अजिंक्य रहाणे आणि श्रीकार भरत पॅव्हेलियनमध्ये परतले त्यावेळी भारताची अवस्था 5 बाद 151 धावा अशी झाली होती. तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारतीय फलंदाज कांगारूंचा वेगवान मारा कितीपत सहन करू शकणार अशी शंका मनात होती.

मात्र झुंजार अजिंक्य रहाणे अजून नाबाद असल्याने मनाच्या एका कोपऱ्यात आपण पुनरागमन करू असा आशावाद देखील होता. हा आशावाद अखेर अजिंक्यने खरा करून दाखवला. तब्बल 512 दिवासांनी भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्यने शार्दुलच्या साथीने भारताला 300 धावांच्या जवळ पोहचवण्याचा प्रयत्न केला. त्याने 89 धावांची खेळी केली. अजिंक्यने शतक पूर्ण करावे आणि आपल्या पुनरागमन ऐतिहासिक करावे असे वाटत होते. मात्र त्याच्या शतकाची सल मनात कायम राहील.

जरी अजिंक्यचे शतक हुकले असले तरी त्याने मुंबईकर शार्दुल ठाकूरसोबत सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत बिकट परिस्थितीतही तुम्ही सकारात्मक मानसिकता ठेवली तर विरोधात गेलेल्या गोष्टी देखील बदलू शकता हे दाखवून दिले. भारत WTC Final जिंकण्यासाठी चमत्काराची गरज आहे असं बरेच जण सांगतात. मात्र इच्छाशक्ती आणि मानसिकता असेल तर टीम इंडिया दोन दिवसात 500 धावा देखील चेस करू शकते.

मुंबईचा खडूसपणा अजूनही जिवंत

अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर हे दोघेही मुंबईचे. अजिंक्यच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याला जानेवारी 2022 मध्ये भारतीय कसोटी संघातून डच्चू देण्यात आला. तो भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवला होता. तरी देखील त्याला आपल्या संघातील स्थान गमवावे लागले.

दुसरीकडे नवनवे खेळाडू कसोटीतील त्याची जागा घेण्यासाठी आतूर होते. अजिंक्यला स्वतःला सिद्ध करण्यासाठी डोमॅस्ट्रिक सामने खेळावे लागले. तेथेही त्याने आपला फॉर्म परत मिळवला आणि आयपीएलमध्ये सीएसकेच्या कळपात जाऊन टीम इंडियाच्या दारावार जोरदार धडका मारल्या. अखेर संपलेल्या कसोटीपटूला पुनरूज्जीवन मिळाले.

तशीच काहीशी गत ही शार्दुल ठाकूरची होती. त्याला भारतात कसोटी संघात स्थान मिळत नाही. मात्र ज्या ज्या वेळी त्याला संधी मिळते तो संघासाठी धावून येतो. मग गोलंदाजी असो वा फलंदाजी तो आपला मुंबईचा खडूसपणा दाखवतोच. आजही त्याने रहाणेसोबत सातव्या विकेटसाठी 109 धावांची शतकी सलामी केली. त्यानंतर त्याने 51 धावांची अर्धशतकी खेळी देखील केली. गोलंदाजीत डेव्हिड वॉर्नर आणि स्मिथची विकेट घेतली.

गोलंदाजीची धार परतली

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 173 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात भारताला कांगारूंना स्वस्तात गुंडाळे खूप गरजेचे होते. याची सुरूवात भारतीय गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रातच केली. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात ज्या चुका केल्या त्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना सुधारल्या. त्यामुळेच भारतीय संघ कांगारूंचे 123 धावात चार फलंदाज बाद करू शकला.

मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज पाठोपाठ आता रविंद्र जडेजाने देखील विकेट्स घेण्यास सुरूवात केली आहे. त्याने पहिल्या डावातील शतकवीर स्मिथ आणि हेडची शिकार केली. यामुळे आता सामन्याच्या चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारताला कांगारूंचा डाव लवकरात लवकर संपणे सोपे होणार आहे.

भारत उद्या जर ही कामगिरी करू शकला तर भारतासमोर 400 धावांचे टार्गेट जरी असले तरी मिळालेला वेळ आणि खेळपट्टी पाहता भारत हे या टार्गेटच्या जवळ जाऊ शकतो हे नक्की! फक्त भारताकडून दोन चांगल्या भागीदारी आणि दोन फलंदाजांनी शतकी खेळी करणे गरजेचे आहे.

मानसिकता कळीचा मुद्दा

भारत ओव्हलच्या खेळपट्टीवर 400 धावा देखील चेस करू शकतो असं म्हणण्यामागं कारण आहे. आताची खेळपट्टी पाहिली तर चेंडू थोडा असमान उसळी घेत आहे. मात्र ही खेळपट्टी खूप खराब झाली आहे असं नाही. खेळपट्टीवर पॅचेस पडलेले नाहीत. गवतही हिरवं राहिलेलं नाही. त्यामुळे जर एखादा फलंदाज टिकून खेळला तर तो मोठी खेळी करू शकतो. हे आज अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूरने दाखवलून दिलं आहे.

विशेष म्हणजे तर भारतीय संघाने कांगारूंचा दुसरा डाव पहिल्या सत्रात लवकर संपवला तर भारताला चौथ्या दिवसाचे दोन सत्र आणि पाचव्या दिवसाचे तीन असे पाच सत्र फलंदाजी करण्याची संधी मिळेल. सहसा विकेट ही पाचव्या दिवशी शेवटच्या दोन सत्रात ब्रेक होते. तोपर्यंत भारताला 400 धावांचे आव्हान पार करण्यासाठी बराच वेळ मिळेल.

फक्त भारतीय फलंदाजांनी सकारात्मक मानसिकतेने फंलदाजी करणे गरजेचे आहे. कांगारूंचे गोलंदाजही थकतात. त्यामुळे ते पाच सत्र त्याच ताकदीने गोलंदाजी करू शकणार नाहीत. भारताला आपल्या दुसऱ्या डावात चांगली सुरूवात करावीच लागले. त्यावरच भारताचे मोठी धावसंख्या चेस करण्याचे यश अपयश अवलंबून आहे. त्यामुळे रोहित आणि विराटला कंबर कसावी लागेल. भारतीय फलंदाजीत तितकी क्षमता नक्की आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT