WTC Final Race Sri Lanka dominance in New Zealand test Damage India's Qualification Hopes  sakal
क्रीडा

WTC Final : श्रीलंकेचे कसोटीत वर्चस्व; भारतीय संघाला चिंता

भारताला अहमदाबाद कसोटी जिंकावी लागणार आहे तसे झाले नाही तर....

सकाळ ऑनलाईन टीम

खाईस्टचर्च, ता. १० : साडेतीनशे धावांपर्यंत मारलेली मजल आणि त्यानंतर दीडशे धावांपर्यंत न्यूझीलंडचा बाद केलेला निम्मा संघ अशी कामगिरी करणाऱ्या श्रीलंकेने या पहिल्या कसोटी सामन्यात वर्चस्व मिळवून भारतावरचे दडपण वाढवले आहे.

येथे अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात धावांचा डोंगर उभा केला आहे; तर ख्राइस्टचर्चमध्ये श्रीलंका कमाल करत आहे. कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यातील दुसरा संघ भारत आणि श्रीलंका यातून निश्चित होणार आहे.

भारताला अहमदाबाद कसोटी जिंकावी लागणार आहे. तसे झाले नाही, तर श्रीलंका न्यूझीलंडविरुद्धच्या दोनपैकी एका कसोटीत पराभूत होणे भारतासाठी मार्ग मोकळा करणारे ठरणार आहे; परंतु श्रीलंकेने पहिल्या कसोटीत शानदार सुरुवात केली आहे.

न्यूझीलंडच्या थंड हवामानात आणि वेगवान गोलंदाजांना पूरक अशा वातावरणात उपखंडातील खेळाडूंना फलंदाजी करणे कठीण जाते, असे म्हटले जाते; परंतु श्रीलंकेने पहिल्या डावात ३५५ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडची ५ बाद १६२ अशी अवस्था केली. न्यूझीलंडचा संघ अजूनही १९३ धावांनी पाठीमागे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT