virat kohli
virat kohli e sakal
क्रीडा

'विराट' प्रेम; कोहलीच्या ट्रायसेप्सवर आईच्या नावाचा टॅटू

सुशांत जाधव

mother's day 2021 : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने क्रिकेटच्या मैदानात विशेष छाप उमटवली आहे. जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. मैदानातील धमाकेदार कामगिरीसोबतच वैयक्तिक जीवन आणि आपल्या स्टाईल स्टेटमेंटने देखील विराट प्रकाशझोतात असतो. त्याच्या फिटनेसची जशी चर्चा होते अगदी तशीच चर्चा त्याच्या अंगावर असणाऱ्या टॅटूची (Virat Kohli ) देखील होते. स्टाईलीश क्रिकेटरच्या अंगावर जवळपास 11 टॅटू आहेत. प्रत्येक टॅटूमागे काहीना काही कारण दडले आहे. मदर डेच्या निमित्ताने जाणून घेऊयात त्याच्या अंगावरील आईच्या नावाच्या टॅटूबद्दल...(mother name saroj tattoo )

क्रिकेटच्या मैदानात आपल्या आक्रमक अंदाजाने ओळखला जाणारा कोहली हळव्या मनाचा आहे, असे म्हटल्याच अनेकांना आश्चर्य वाटेल. पण जे विराटला पहिल्यापासून फॉलो करतात त्यांनी त्याच्या हळवेपणाच्या गोष्टी सहज टिपल्या असतील. कोहली-अनुष्का शर्मा यांच्यातील ब्रेकअपच्या बातम्या ज्यावेळी येत होत्या त्यावेळी कोहलीच्या हळव्या मनाचे दर्शन घडले होते. अनुष्कासोबतच्या अबोला आणि त्याने आईसोबत शेअर केलेले फोटो त्यावेळी चांगलेच लक्षवेधी ठरले होते.

कोहलीच्या आय़ुष्यात आई-वडिलांविषयी विशेष स्थान आहे. कोहली जेव्हा 18 वर्षांचा होता त्यावेळी त्याचे वडील प्रेम यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी कोहलीने रणजी सामन्यात 90 धावांची खेळी केली होती. कोहली वडिलांच्या स्मर्नार्थच 18 क्रमांकाची जर्सी घालतो. त्याच्या अंगावर अनेक टॅटू आहेत. या टॅटूमध्येही त्याने आई सरोज आणि वडील प्रेम यांची नावे कोरली आहेत. त्याच्या डाव्या हाताच्या ट्रायसेप्सवर आईचे नाव कोरल्याचे दिसून येते. तर दुसऱ्या हातावर वडिलांचे नाव आहे.

virat kohli tatoo

नव्या पीडितील खेळाडूंमध्ये अंगावर टॅटू काढण्याचा एक अनोखा ट्रेंड सेट झाल्याचे पाहायला मिळते. विराट कोहली या खेळाडूंमध्ये आघाडीचं नाव आहे. त्याच्या अंगावर 11 वेगवेगळे टॅटू आहेत. अनेक क्रिकेटर्स विराटच्या पावलावर पाउल टाकत अंग टॅटूमय करत आहेत. ही क्रेझ पाहता अगामी भारतीय संघातील अकरा खेळाडूंच्या टॅटू प्रेमी असल्याचे चित्र दिसल्यास ते नवल वाटणार नाही. पण विराटच्या टॅटूप्रेमात आई वडिलांचे स्थान खूप काही सांगून जाणारे आहे हे निश्चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT