Yuvraj Singh Video eSakal
क्रीडा

Yuvraj Singh 6 Six : युवराज सिंग म्हटलं की आठवतात '6 बॉल 6 सिक्स'; पाहा ऐतिहासिक क्षणाचा व्हिडिओ

या मॅचला युवराज सिंग, स्टुअर्ट ब्रॉड आणि क्रिकेट फॅन्स कधीही विसरु शकणार नाहीत.

Sudesh

भारतीय क्रिकेट संघातील स्फोटक फलंदाज म्हणून युवराज सिंगची ओळख आहे. युवराज आता निवृत्त झाला असला, तरीही त्याचं नाव ऐकताच फॅन्सना आठवतात ते त्याने एकाच ओव्हरमध्ये चोपलेले सहा षटकार! आज युवराजच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या या कामगिरीचा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

युवराजने 15 वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध एका T-20 सामन्यात हा कारनामा केला होता. या मॅचला युवराज सिंग, स्टुअर्ट ब्रॉड आणि क्रिकेट फॅन्स कधीही विसरु शकणार नाहीत. इंग्लंडच्या टीममधील खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफसोबत युवराजचा वाद झाला होता, मात्र याचा फटका स्टुअर्ट ब्रॉड या नवख्या बॉलरला बसला.

या सामन्यात टॉस जिंकून भारताने बॅटिंगचा निर्णय घेतला होता. सेहवाग-गंभीर या दोघांनीही अर्धशतक करून भारताला चांगली सुरुवात करून दिली होती. 155 धावांवर असताना टीम इंडियाला तिसरा झटका बसला, आणि क्रीजवर धोनी आणि युवराज हे दोन नवे बॅट्समन आले.

यानंतरची ओव्हर टाकण्यासाठी इंग्लिश ऑलराउंडर अँड्र्यू फ्लिंटॉफ बॉलिंगला आला. यावेळी युवराजने त्याला दोन फोर मारले. यामुळे तो चिडला, आणि ओव्हर संपल्यानंतर युवराजला त्याने धमकी दिली. या दोघांमधील वाद वाढल्यानंतर अंपायर्सना मध्ये यावं लागलं. या वादामुळे आधीच संतापलेला युवराज, पुढच्या ओव्हरमध्ये बॅटिंगसाठी क्रीजवर आला. अवघ्या 21 वर्षांचा स्टुअर्ट ब्रॉड ही ओव्हर टाकणार होता.

याच ओव्हरमध्ये युवराजने सलग सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकत एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. एवढंच नाही, तर टी-20 इंटरनॅशनलमध्ये केवळ 12 चेंडूंमध्ये अर्धशतक करण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: लासलगावमध्ये धान्य व टोमॅटो व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला

SCROLL FOR NEXT