Yuzvendra Chahal 
क्रीडा

Yuzvendra Chahal : 'मी बाथरूममध्ये खूप रडलो...', चहलचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ब्लॅक फेजबद्दल मोठा खुलासा

Kiran Mahanavar

Yuzvendra Chahal : भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलने टी-20 विश्वचषक 2021 मध्ये निवड न झाल्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्‍याने सांगितले की, त्‍याच्‍या करिअरमध्‍ये टी-20 विश्‍वचषकासाठी निवड न झाल्‍याचे सर्वाधिक दु:ख झाले होते. चहलच्या म्हणण्यानुसार, जर त्याची पत्नी त्यावेळी त्याच्यासोबत नसती तर त्याला त्याच्या रागावर नियंत्रण ठेवता आले नसते.

2021 मध्ये दुबईत झालेल्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात युझवेंद्र चहलची निवड झाली नव्हती. तो चांगली कामगिरी करत होता पण तरीही त्याची निवड झाली नाही आणि या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्याच्याऐवजी वरुण चक्रवर्ती आणि रविचंद्रन अश्विन या फिरकीपटूंवर भरवसा ठेवण्यात आला होता.

युझवेंद्र चहलने रणबीर अल्लाबदियाच्या शोमध्ये म्हणाले की, मी जास्त रडलो नाही. पण बाथरूममध्ये जाऊन रडलो. 2021च्या टी-20 विश्वचषकासाठी जेव्हा माझी निवड झाली नव्हती, तेव्हा मला खूप वाईट वाटत होते.

पुढे तो म्हणाला की, मला त्यावेळी दुबईतील आयपीएल खेळायला जायचंय होते. दुसऱ्या दिवशी दुबईची फ्लाइट पकडायची होती. कोविडमुळे पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल सामने खेळण्यासाठी आम्हाला जावे लागले. आम्हाला आठवडाभर क्वारंटाईन झालो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यावेळेस धनश्री माझ्यासोबत होती. त्यामुळे मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवू शकलो. ती नसती तर मला जास्त दुःख झाले असते.

2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आधीच फेरीतून बाहेर पडला होता. त्यावेळी पहिल्यांदा विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT