PCB Zaka Ashraf esakal
क्रीडा

PCB Zaka Ashraf : झाका अश्रफ यांनी घेतली तातडीची बैठक, अहमदाबादमधील 'त्या' घटनांची आयसीसीकडे केली तक्रार

अनिरुद्ध संकपाळ

PCB Zaka Ashraf : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्डकप सामना होऊन दोन दिवस उलटले तरी त्या सामन्यादरम्यानचे वाद काही संपण्याचे नाव घेत नाहीये. भारत - पाकिस्तान सामन्यादरम्यान, प्रेक्षकांकडून काही आक्षेपार्ह गोष्टी घडल्या होत्या. त्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला.

आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन झाका अश्रफ यांनी आयसीसीकडे याची तक्रार केली आहे. दरम्यान, अश्रफ यांनी पीसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक तातडीची बैठक घेतल्याचे समजते.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन झाका अश्रफ हे सोमावारी पाकिस्तानात दाखल झाले. त्यांना अहदमाबादमधील भारत - पाकिस्तान सामना पाहण्यासाठी खास आमंत्रण होते. मात्र ते पाकिस्तानात दाखल झाल्या झाल्या त्यांनी पीसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी भारत दौऱ्यावर चर्चा केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'झाका अश्रफ हे अहमदाबादमध्ये प्रत्यक्ष उपस्थिती होते. भारत - पाकिस्तान सामन्यादरम्यान काही घटना घडल्या आहेत त्यामुळे ते खूश नाहीयेत.'

पाकिस्तान क्रिकेट संघाचे संचालक आणि प्रमुख कोच माईक आर्थर यांनी देखील प्रेक्षकांच्या वर्तणुकीबद्दल आणि त्याच्या संघावरील परिणामाबद्दल वक्तव्य केलं. आयसीसी चेअरमन ग्रेग बार्क्ले यांनी देखील प्रतिक्रिया दिली. त्यांनी वर्ल्डकप यशस्वी करण्यासाठी आम्ही चांगले प्रयत्न करू असे सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झाका हे पाकिस्तानी खेळाडूंनी भारताविरूद्ध केलेल्या कामगिरीवर देखील नाराज आहेत. त्यांनी परत येण्यापूर्वी खेळाडूंना अहमदाबादमधील पराभव विसरून पुढच्या सामन्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला त्यांना दिला आहे.

झाका यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ नोव्हेंबर 5 ला संपणार आहे. त्यामुळे झाका यांचे चेअरमनपद देखील धोक्यात आहेत. जुलै महिन्यात झाका आणि क्रिकेट व्यवस्थापन समितीची स्थानपा ही निवडणूक घेऊन बोर्डाचे संचालक मंडळ निर्माण करण्यासाठी करण्यात आली होती. हे मंडळ चेअरमन पदासाठी निवडणूक घेणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT