Zimbabwe Create History  sakal
क्रीडा

टीम इंडिया विरुद्ध खेळण्याआधीच झिम्बाब्वेने रचला इतिहास

टीम इंडिया झिम्बाब्वेमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळण्याआधीच...

Kiran Mahanavar

Zimbabwe Create History : भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळल्यानंतर ऑगस्टमध्ये झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. टीम इंडिया झिम्बाब्वेमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध मालिका खेळण्याआधीच झिम्बाब्वेने इतिहास रचला आहे. झिम्बाब्वेने बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील निर्णायक सामना 10 धावांनी जिंकला. या विजयासह झिम्बाब्वेने मालिका 2-1 अशी जिंकली आणि इतिहास रचला. क्रेग एर्विनच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वे संघाने बांगलादेशविरुद्धची पहिली T20 मालिका जिंकली आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 20 षटकांत 8 गडी गमावून 156 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 8 बाद 146 धावाच करू शकला. अखेरच्या षटकात बांगलादेशला विजयासाठी 18 धावांची गरज होती, मात्र संघाला 10 धावाच करता आल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या 34 धावांत तीन विकेट गमावल्या. महमुदुल्लाहने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही 27 चेंडूत 27 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अफिफ हुसैन 27 चेंडूत 39 धावा करून नाबाद राहिला. मेहंदी हसनने 17 चेंडूत 22 धावा केल्या. व्हिक्टर न्युचीने तीन आणि ब्रॅड इव्हान्सने दोन बळी घेतले.

तत्पूर्वी, झिम्बाब्वेने 20 षटकांत 8 गडी गमावून 156 धावा केल्या होत्या. चकाबवा आणि एविन यांच्यात पहिल्या विकेटसाठी 29 धावांची भागीदारी झाली. मात्र त्यानंतर काही षटकांतच संघाची मधली फळी ढासळली. झिम्बाब्वेने 10 धावांत चार विकेट गमावल्या. रायन बुर्ले आणि एल जोंगवे यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे झिम्बाब्वेने दीडशेचा टप्पा ओलांडता आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate bail : मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा; जामीन मंजूर, तूर्तास अटक टळली!

PM Narendra Modi : रायगडाच्या संवर्धनासाठी खा. नीलेश लंके यांचा पुढाकार; संसदेत पंतप्रधानांशी चर्चा!

IND U19 vs SL U19 SF: जेतेपदासाठी India vs Pakistan भिडणार? उपांत्य फेरीत माफक धावांचे लक्ष्य; श्रीलंका, बांगलादेशला अपयश

Santosh Deshmukh Case: कोर्टाने नाव पुकारलं अन् सुदर्शन घुले चक्कर येऊन पडला; आरोपींकडून वेळकाढूपणा? देशमुख प्रकरणात काय घडलं?

Mumbai: वाहतूक कोंडी सुटणार! मुंबई ते पुणे फक्त ९० मिनिटांत आणि बेंगळुरू प्रवास ५ तासांत होणार, नवीन एक्सप्रेसवेची घोषणा

SCROLL FOR NEXT