Stress Relief Foods
Stress Relief Foods  esakal
लाइफस्टाइल

Stress Relief Foods : ताण-तणावापासून सुटका हवीय? मग, आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश

Monika Lonkar –Kumbhar

Stress Relief Foods : सध्याचे धावपळीचे जीवन, बिघडलेला आहार, व्यायामाचा अभाव आणि कामाचा वाढता ताण यामुळे, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. खरं तर शारिरीक समस्या निर्माण झाल्या तर त्यावर वेळीच उपचार केले जातात.

परंतु, कामाच्या ताणाकडे दुर्लक्ष केले जाते, तुम्ही जर असे करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण, असे केल्यामुळे, मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

शारिरीक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याच्या समस्या देखील महत्वाच्या आहेत. त्यामुळे, या वाढत्या ताण-तणावाकडे दुर्लक्ष न करता त्यावर वेळीच उपचार घेणे, गरजेचे आहे. अन्यथा या ताण-तणावामुळे मानसिक आजार उद्भवण्याची शक्यता असते.

हा मानसिक ताण-तणाव कमी करण्यासाठी तुम्ही आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश करू शकता. कोणते आहेत ते खाद्यपदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.

लिंबूवर्गीय फळे

एप्रिल महिन्याला सुरूवात झाली असून आता उन्हाच्या झळ देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे, उष्माघाताची समस्या टाळण्यासाठी आणि ताण-तणाव कमी करण्यासाठी तुम्ही आहारात लिंबूवर्गीय फळांचा समावेश करणे महत्वाचे आहे.

मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी व्हिटॅमीन सी ने युक्त असलेल्या फळांचा तुमच्या आहारात समावेश करा. यासाठी तुम्ही लिंबू, संत्रा, आवळा, मोसंबी, कैरी इत्यादी फळांचे सेवन करू शकता. (Citrus fruits)

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. मॅग्नेशिअमचा प्रमुख स्त्रोत असलेल्या या हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश असणे फार महत्वाचे आहे. पालक, मेथी, कांद्याची पात इत्यादी पालेभाज्यांचा तुमच्या दिनचर्येत समावेश करायला विसरू नका. या हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने आपले मन शांत आणि आनंदी राहते. ताण-तणाव कमी होऊन चिंता ही कमी होते. (Green Vegetables)

झिंक

आपल्या आहारात झिंकयुक्त पदार्थांचा समावेश अवश्य करा. कारण, या झिंकयुक्त खाद्यपदार्थांमुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. शिवाय, ताण-तणाव आणि चिंता कमी होण्यासाठी हे झिंकयुक्त खाद्यपदार्थ फायदेशीर ठरतात. यासाठी तुम्ही आहारात अंडी, शेंगदाणे, काजू, बदाम, पालक इत्यादी खाद्यपदाथांचा जरूर समावेश करा. (Zinc)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT