Akshaya Tritiya 2023 esakal
लाइफस्टाइल

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला माठ का खरेदी केला जातो? काय आहे त्यामागील कारण

आजच्या दिवशी नवीन माठ खरेदी केला जातो, त्याची पुजा केली जाते

Pooja Karande-Kadam

Akshaya Tritiya 2023 : आपल्या पंचांगाप्रमाणे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे अक्षय्य तृतीया २३ एप्रिल २०२३ रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तुंचे दान करतो. किंवा खरेदी करतो. त्याला खास असे महत्त्व आहे.

आजच्या दिवशी नवीन माठ खरेदी केला जातो. त्याची पुजा केली जाते. तो का केला जातो. याबद्दल जाणून घेऊयात.

वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने मातीचे माठ किंवा रांजण दान करावे. मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम राहते. तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय्य तृतीयेपासून खाण्यास सुरुवात होते. अक्षय्य तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्र पठण अखंड टिकून राहते, अशा मान्यता आहे. याशिवाय अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवी प्रकट झाली होती, असेही सांगितले जाते.

अक्षय तृतीयेचा सण हा उन्हाळ्यात येणारा सण आहे. या दरम्यान उन्हाच्या तीव्र झळा सुरू होतात. अशातच थंड पाण्याने उष्णतेपासून जास्तीत जास्त आराम मिळतो. आजकाल, बहुतेक लोकं उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी रेफ्रिजरेटरवर अवलंबून असतात.

परंतु काही लोकं उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी मातीची भांडी वापरणे चांगले मानतात. शास्त्रानुसार घरात आणलेल्या मातीच्या भांड्याची पूजा करावी, कारण हे मातीचे  भांडे कलशाचे प्रतीक मानले जाते, ज्यामध्ये तेहतीस कोटी देव-देवतांचा वास असतो, असे मानले जाते.

हिंदू धर्मग्रंथानुसार कलशाच्या गाभ्यामध्ये प्रजापिता ब्रह्मा, कंठात महादेव रुद्र आणि मुखात भगवान विष्णू वास करतात. कलश हे परिपूर्णतेचे प्रतीक आहे आणि ज्या घरात कलशाची पूजा केली जाते. त्या घरात सुख-समृद्धी आणि शांती सदैव राहते. त्याचबरोबर पाण्याला वरुण देवाचे रूप मानले जाते आणि पाण्याला प्रत्यक्ष देवता असेही म्हटले आहे.

उन्हाळ्यात, पाण्याच्या भांड्याला कलश मानून त्याची पूजा केली जाते जेणेकरून ते पाणी पिणार्‍यासाठी अमृतसारखे कार्य करते. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर फ्रिज पेक्षाही अधिक चांगलं माठातील पाणी असतं.माठातील पाण्याचे अनेक फायदे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT