Akshayya Tritiya 2024 Sakal
लाइफस्टाइल

Akshayya Tritiya 2024: उन्हामुळे आंबा खाण्याची भीती वाटते? अक्षय तृतीयेला 'अशा' प्रकारे बनवा आमरस; आजिबात होणार नाही त्रास

Aamras: अनेक लोक जास्त आमरस खायला घाबरतात कारण आंबा हा उष्ण असतो. यामुळे शरीराला त्रास होऊ शकतो. पण काही गोष्टी लक्षात ठेवल्यास आमरस पोटभर खाऊ शकता.

पुजा बोनकिले

यंदा अक्षय तृतीया १० मे रोजी साजरी केली जाणार आहे. या शुभ मुहुर्तावर घरोघरी आमरस पुरीचा आस्वाद घेतला जातो. आंब्यामध्ये हापूस, पायरी,केसर यासारखे अनेक प्रकार आहेत. विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने आमरस बनवला जातो. अनेक लोक जास्त आमरस खायला घाबरतात कारण आंबा हा उष्ण असतो. यामुळे शरीराला त्रास होऊ शकतो. पण आमरस बनवताना पुढील गोष्टी लक्षात ठेवल्यास आमरस पोटभर खाऊ शकता आणि कोणताही त्रास होणार नाही.

मीरपुड आणि तूप

आमरस खाताना मीरपुड आणि तुप टाकून खावे. कारण यामुळे पचनसंस्था सुरळित राहते. मीरपुड आणि तूप हे दोन्ही पदार्थ आमरस पचवायला मदत करतात. यामुळे आमरस खातना तूप टाकून खावे.

कोय आणि साल दुधात धुवावे

आंब्याचा गर काढल्यानंतर थोडा कोयीला आणि सालांना राहतो. हा गर काढण्यासाठी अनेक लोक पाण्याचा वापर करतात. पण यामुळे आंबा बाधण्याची समस्या निर्माण होऊ शकते. पण आंब्याचा गर काढण्यासाठी दुधाचा वापर करावा. यामुळे कोणतीही समस्या निर्माण होत नाही.

आंबे पाण्यात ठेवावे

आंबा हे फळ उष्ण असते. यामुळे आमरस बनवण्यापुर्वी आंबे थंड पाण्यात भिजत ठेवावी. यामुळे आंब्यातील उष्णता कमी होते. तसेच आमरस खाल्ल्यास पोटाला त्रास होत नाही.

आंबे स्वच्छ धुवावे

आंब्याचा चीक तोंडात गेल्यास तोंड येणे, फोड येणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच पोटात हा चीक गेल्यास जुलाब होऊ शकतो. यामुळे आमरस बनवण्यापुर्वी आंबे स्वच्छ धुवावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Semi Final : २२ वर्षीय Phoebe Litchfield भारी पडली; पेरी, गार्डनर यांची तुफानी खेळी, भारतासमोर ३००+ धावांचे लक्ष्य

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली अन्..

IND vs AUS Semi Final : हिला, झोडायला टीम इंडियाच मिळाली होती! Phoebe Litchfield चा वर्ल्ड रेकॉर्ड अन् दोन भारी विक्रम

Delhi Riots 2020 Update : ‘’अचानक नव्हता उफळला दिल्लीत हिंसाचार, सत्ता बदलण्यासाठीचा तो होता कट’’ ;पोलिसांचा दावा!

Rohit Arya News: नाराजी सरकारवर; पण माथेफिरूचा मुलांच्या जीवाशी खेळ, पडद्यामागची फिल्मी गोष्ट आली समोर

SCROLL FOR NEXT