Alia Bhatt Party Looks
Alia Bhatt Party Looks esakal
लाइफस्टाइल

Alia Bhatt Party Looks : पार्टीमध्ये हटके दिसायचंय? मग, आलिया भट्टचे 'हे' ट्रेंडी लूक्स नक्की करा ट्राय

Monika Lonkar –Kumbhar

Alia Bhatt Party Looks : आजकाल डेटवर जाताना किंवा कोणत्याही पार्टीमध्ये सहभागी होताना कोणता आऊटफीट ट्राय करावा? असा प्रश्न अनेक तरूणींना पडतो. नेहमीचे वनपीस किंवा त्याच प्रकारचे आऊटफीट्स ट्राय करून कंटाळा आलेला असतो.

त्यामुळे, पार्टीत उठून दिसण्यासाठी किंवा हटके दिसण्यासाठी काहीतरी वेगळे ट्राय करावे. असे कित्येक तरूणींना वाटत असते. यासाठी मग बॉलिवूड अभिनेत्रींच्या वेस्टर्न लूक्सपासून प्रेरणा घेतली जाते. त्यांचे लूक्स रिक्रिएट केले जातात.

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) तिच्या अभिनयासाठी आणि अलौकिक फॅशन सेन्ससाठी खास करून ओळखली जाते. तिचे विविध प्रकारचे लूक्स तुम्ही पार्टीसाठी नक्कीच रिक्रिएट करू शकता.

खास करून आलियाचे लेटेस्ट लूक्स तुम्ही पार्टीसाठी नक्कीच ट्राय करू शकता. या सर्व आऊटफीट्समध्ये आलिया कमालीची सुंदर दिसतेय. चला तर मग आलियाच्या या ट्रेंडी लूक्सबद्दल जाणून घेऊयात. (Alia Bhatt Party Looks)

ब्लॅक वेलवेट साडी

साडी हा एक असा ऑप्शन आहे की, जो तुम्ही कोणत्या ही कार्यक्रमासाठी नेसू शकता. कारण, साडीमध्ये आजकाल असंख्य प्रकार पहायला मिळतात. साडीमध्ये पार्टीवेअरचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आलिया भट्टने नेसलेली ही ब्लॅक वेलवेट साडी होय.

पार्टीसाठी तुम्ही अशाप्रकारची साडी नक्कीच नेसू शकता. या साडीला सुंदर गोल्डन बॉर्डर असून, त्यावर तिने केलेला मेकअप, हेअरस्टाईल आणि ज्वेलरीमुळे आलिया यात खूपच स्टनिंग दिसतेय.

पार्टीसाठी या प्रकारची ब्लॅक किंवा कोणत्याही रंगाची वेलवेट साडी तुम्ही ट्राय करू शकता. त्यावर गोल्डन स्टड, पर्ल ज्वेलरी किंवा चोकर मॅच करू शकता. यावर मिनिमल मेकअप आणि मिनिमल ज्वेलरीसोबत केसांचा मेस्सी बन करायला विसरू नका. (Black Velvet Saree)

आलियाचा कॉर्सेट अंदाज

गुजरातमधील जामनगरमध्ये नुकताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा प्रीवेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी आलियाने स्टनिंग अंदाजात हजेरी लावली होती. वेस्टर्न थीमनुसार आलियाने ब्लू आणि ब्लॅक कलरचा कॉर्सेट गाऊन परिधान केला होता. या गाऊनमध्ये आलिया खूपच ग्लॅमरस दिसत होती.

या कॉर्सेट लूकसाठी आलियाने ब्लू आणि ब्लॅक रंगाची निवड केली होती हा वेलवेट कॉर्सेट पार्टीसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही देखील पार्टीमध्ये हटके लूक करण्यासाठी या प्रकारचा वेलवेट कॉर्सेट गाऊन कस्टमाईज करू शकता. तुम्हाला या प्रकारचा वेलवेट गाऊन मार्केटमध्ये सहज मिळू शकेल. (Alia Bhatt Corset look)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT