Ambabai Mandir Kirnotsav esakal
लाइफस्टाइल

Ambabai Mandir Kirnotsav : कोल्हापुरच्या अंबाबाईच्या देवळात दरवर्षी दोनदा घडतो हा चमत्कार, घटनेला आहे पौराणिक महत्त्व

२१ दिवसांच्या गणितात घडतो जोतिबा मंदिरावरील आई चोपडाई देवीचा किरणोत्सव

Pooja Karande-Kadam

Ambabai Mandir Kirnotsav : 

करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मंदिरात कित्तेक वर्ष एक दैवी चमत्कार घडतो आहे. ज्याला खगोल शास्त्रीय अनन्य साधारण असे महत्त्व आहे. करवीर निवासिनीच्या मंदिरात ऑक्टोबर आणि फेब्रूवारी या दोन महिन्यात एक घटना घडते. या घटनेमागे एक पौराणिक कथाही आहे.

किरणोत्सव करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या वर्षभरातल्या सर्व उत्सवात अनोखा असा उत्सव म्हणजे किरणोत्सव होय. सूर्याची मावळती किरणं साक्षात जगदंबेच्या विग्रहाला सोनसळी अभिषेक घालून नटवतात.

दरवर्षी होणाऱ्या या सोहळ्याची उत्सुकता अनेकांना असते. प्रत्येकवर्षी उत्तरायणात ३१ जानेवारी १,२ फेब्रुवारी तर दक्षिणायनात ९,१०,११ नोव्हेंबर हे किरणोत्सवाचे पारंपरिक दिवस आहेत.  पण या उत्सवाच्या तारखांचा अभ्यास करण्यासाठी आधी आणि नंतर एक दोन दिवस निरिक्षण ठेवण्याचा प्रघात २०१८ पासून पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने ठेवला आहे त्याचे चांगले परिणाम ही दिसून येत आहेत.

किरणोत्सव हा एकमेव असा उत्सव आहे ज्यात मानवाची काही भूमिका असत नाही. किंबहुना मानवी हस्तक्षेप या सोहळ्याला खपतच नाही हा सोहळा फक्त आईचा आणि जग भ्रमण करुन थकलेल्या तिच्या तेजस्वी पुत्राचा म्हणजे सूर्याचा. त्यामुळे किरणोत्सव पहायला मिळणं हे सर्वस्वी जगदंबेवर अवलंबून असते.

इतर उत्सवांना आहे तशी पौराणिक कथा किरणोत्सवाला नसली. तरी हरी गोपाळ अंगापूरकर लिखित लक्ष्मीविजय ग्रंथांत दिलेल्या कथेप्रमाणे कोल्हासूराच्या वधानंतर त्याच्या शरिरातून बाहेर पडलेल्या पंचप्राणांनी प्रथम देवीचे चरण, नंतर पोट अन् छाती, मग चेहरा उजळला अन् पुन्हा आलेल्या मार्गाने तो अग्नी जगदंबा चरणांशी विलीन झाले. त्याचीच प्रचिती लोकांना आजही येते.

या उल्लेखावरूनच ‌पाच दिवसांचा किरणोत्सव होता हे गृहीतक मांडलं आणि १९४६ च्या कोल्हापूर महानगर पालिकेच्या अहवालाने ते सिद्धही झाले. किरणोत्सव होणारं करवीरनिवासिनीच एकमेव मंदिर आहे असं नाही.

अनेक मंदिरात सूर्याची उगवती किंवा मावळती किरणं देव मूर्तीला स्पर्श करतात पण करवीर निवासिनीच्या मंदिराच आगळं वैशिष्ट्य हे की महाद्वारापासून १०० ते १५० मीटरचं अंतर कापून   ही किरणं मंदिरात देवी पर्यंत पोहोचतात.

आजही या दिवशी सूर्यास्तापूर्वी अर्धा ते पाऊण तास सर्व विद्युत दिवे घालवले जातात दर्शन रांग थांबवली जाते. महाद्वार रोड,गरूड मंडप, मध्यभागी, गणपतीमंदिरामागील जीना, गणपती मंदिर चौक, कासव चौक, पितळी उंबरठा, खजिना चौक, गर्भगृह, गर्भकूटी असा प्रवास करून सुर्याची किरणे देवी अंबाबाईच्या संपूर्ण शरीरावर विसावतात.

मंदिराचे बांधकाम करताना खगोलशास्त्राचा असा वापर केला आहे की, ज्यामुळे किरणोत्सवाच्या काळात संपूर्ण मूर्ती सुर्यकिरणांनी व्यापली जाते. देवीच्या मूर्तीला स्पर्श करतात. नेत्र आणि मन धन्य करतात.

देवीची मूर्ती सप्तशतीत म्हणल्याप्रमाणे तप्तकांचन वर्णा अर्थात तापलेल्या सोन्याच्या रंगाची भासते. घाटी दरवाजा वरच्या मोठ्या घंटेचा निनाद होतो वैशिष्ट्य म्हणजे आजच्या दिवशी करवीर निवासिनीची सहावी कापूरारती होते. किरणोत्सवाचा सोहळा संपन्न होतो.

बाकीच्या दिवशी का नाही

सूर्य तर रोजच उगवतो अन् मावळतो मग तो फक्त वर्षातील काहीच दिवस का देवीच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचतो असा प्रश्नही अनेकांना पडला असेल. तर, खगोलशास्त्राचे अभ्यासक सांगतात की, मंदिराचे बांधकाम करणाऱ्या कारागिराचे हे कौशल्य आहे की, दक्षिणायण अन् उत्तरायणातील तीन दिवसच सूर्य देवीच्या गर्भगृहापर्यंत पोहोचतो.

आई चोपडाई देवीचा किरणोत्सव

जोतिबा मंदिरावर असलेल्या चोपडाई देवीच्या मंदिरातही किरणोत्सव घडतो. त्याचे खास वैशिष्ट्य असे आहे की, वर्षाच्या सुरूवातीचा अंबाबाई देवीचा उत्तरायण किरणोत्सव संपल्यानंतर २१ दिवसांनी चोपडाई देवीचा किरणोत्सव पार पडतो. तर दक्षिणायण किरणोत्सवाच्या वेळी म्हणजे ऑक्टोबर महिन्यात अंबामातेच्या किरणोत्सवाच्या २१ दिवस आधी चोपडाईदेवीच्या मंदिरात किरणोत्सव होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT