Anant-Radhika Wedding esakal
लाइफस्टाइल

Anant-Radhika Wedding : अनंत अंबानीचे हत्तीवरील प्रेम लग्नातही दिसलं, शाही शेरवानीवरही विराजमान झाला १४ कोटींचा हत्ती

Anant Ambani Brooch : अनंत अंबानी यांना जंगली प्राणी अतिशय आवडतात. त्यामुळेच त्यांनी वंतारा हा प्रोजेक्ट सुरू केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Anant Radhika Wedding :  

अनंत अंबानी राधिका यांचा विवाह काल रात्री दणक्यात पार पडला. या विवाहसोहळ्याला जगभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात नवरदेव अनंत अतिषय सुरेख अशा शेरवानीमध्ये सजला होता. पण सर्वांचे लक्ष्य होते ते त्याने शेरवानीला लावलेल्या ब्रूचकडे.

असणारच कारण, हा ब्रूच साधा नव्हता. तर, त्याची किंमत कोटीच्या घरात होती. अनंत अंबानीने शेरवानीवर घातलेल्या हत्तीचा ब्रूच १४ कोटी रूपयाचा होता.  

अनंतचे ब्रोचेसवरचे प्रेम बऱ्याच वेळा दिसून आले आहे. तो बऱ्याचदा प्राण्यांच्या आकाराचे ब्रोचेस घालताना दिसतो. आता अनंतच्या हत्तीच्या आकाराच्या ब्रोचने पुन्हा आमचे लक्ष वेधून घेतले.

त्याच्या पुढच्या बाजूला गोलाकार आणि बारीक आकाराचे हिरे जडलेले आहेत. ज्वेलरी ब्लॉगर, जिया भन्साळी यांच्या मते, ब्रोचची किंमत 14 कोटी इतकी आहे. (Anant-Radhika Wedding)

संगीत संध्याला घातला टायगरचा ब्रूच

याआधीच्या संगीत सेरेमनीलाही अनंतचे हे प्राणी प्रेम दिसले होते. त्याने संगीत संध्या कार्यक्रमात त्याने टायगरच्या आकाराचा ब्रूच घातला होता.

संगीत कार्यक्रमाला अनंतने खोसला लेबलचे सोन्याचे भरतकाम केलेले जॅकेट घातले होते. त्याने जॅकेटवर हिऱ्यांनी जडलेला ब्रोच घातला होता. ज्यामध्ये रॉयल बंगाल टायगर ब्रोच होता. हा टायगर ब्रूच थीडी होता.

अनंत अंबानी यांना जंगली प्राणी अतिशय आवडतात. त्यामुळेच त्यांनी वंतारा हा प्रोजेक्ट सुरू केला आहे. 'स्टार ऑफ द फॉरेस्ट' असा वंताराचा अर्थ होतो. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाऊंडेशनने या  प्रोजेक्टची सुरूवात केली आहे.

अनंतचा वंतारा प्रोजेक्ट

गुजरातमधील रिलायन्सच्या जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्सच्या जवळ वंतारा प्रोजेक्ट आहे. यामध्ये 3,000 एकरात एलिफंट सेंटर आहे. इथे हत्तींसोबत इतर 43 प्रजातींचे 2,000 हून अधिक जंगली प्राणी आहेत. जंगली प्राणी आहेत. जे जखमी आहेत त्यांच्यावर इथे उपचारही केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT