Anant Radhika Wedding esakal
लाइफस्टाइल

Anant Radhika Wedding : अंबानींच्या लग्नात मराठमोळ्या तरूणीचा बोलबाला..! नववधूचीच नाही तर नीताभाभीची देखील आहे लाडकी मेकअप आर्टिस्ट

Anant Radhika Wedding : सध्या सोशल मीडियावर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची जोरदार चर्चा पाहायला मिळतेय.

Monika Lonkar –Kumbhar

Anant Radhika Wedding : मेकअप इंडस्ट्रीला ग्लॅमरतेचे अनोखे कोंदण लाभले आहे. दिवसेंदिवस या मेकअप इंडस्ट्रीचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असून त्यात नाविन्यपूर्ण गोष्टींची भर पडत आहे. या क्षेत्रात काम करताना अनेक क्रिएटिव्ह गोष्टींचा वापर करावा लागतो. यामध्ये करिअर करत असलेल्या व्यक्तींना सतत मेकअप इंडस्ट्रीतील नवनवीन अपडेट्सवर लक्ष केंद्रित करावे लागते. तसेच, क्लायंट म्हणेल त्याप्रमाणे मेकअप करावा लागतो.

सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळतेय. अनंत-राधिकाचे लग्नातील लूक्स आणि अंबानी कुटुंबातील सदस्यांचे लूक्स व्हायरल झाले आहेत. अंबानी कुटुंबाची लाडकी लेक ईशा अंबानीचे लूक्स देखील चर्चेत आले आहेत.

ईशा अंबानीचे विविध सोहळ्यांमधील आणि कार्यक्रमांमधील लूक्स नेहमीच गाजतात. खास करून तिच्या मेकअपची नेहमीच चर्चा होते. अंबानी कुटुंबातील महिलांच्या मेकअपमागे एका मराठमोळ्या तरूणीची कमाल आहे?  हे तुम्हाला माहित आहे का? कोण आहे ती मेकअप आर्टिस्ट जी ईशा अंबानीसोबतच अनेक सेलिब्रिटींचे मेकअप करते?  चला तर मग जाणून घेऊयात तिच्याबद्दल.

तन्वी चेंबुरकर कोण आहे?

सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्टच्या क्षेत्रात तन्वी चेंबुरकर या मराठमोळ्या तरूणीने आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. लहानपणापासूनच तन्वीला सामान्य वस्तूंचे विलक्षण कलाकृतींमध्ये रूपांतर करण्याची आवड होती. ती अनेक क्रिएटिव्ह गोष्टी तेव्हापासूनच साकारायची. तिला मिळालेल्या या जन्मजात कौशल्यामुळे ती मोठेपणी सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट होईल, असे तिला स्वप्नातही वाटले नव्ह्ते.

तन्वी चेंबुरकर

तन्वीचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण नाशिकमध्ये झाले आहे. तिने नाशिकच्या R.Y.College मधून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, तिने  पुढील शिक्षणासाठी मुंबई गाठली. मुंबईत आल्यावर तिने अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन Advertising  आणि ग्राफिक डिझायनिंगमध्ये पूर्ण केला. त्यानंतर, तिने आर्ट्समध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यावर मेकअप आर्टिस्टचा प्रोफेशनल कोर्स केला. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तिने मेकअप आर्टिस्ट म्हणून कामाला सुरूवात केली.

क्रिएटिव्ह गोष्टींच्या आगळ्यवेगळ्या कौशल्यामुळेच ती मेकअप आर्टिस्टच्या क्षेत्राकडे वळली. मागील काही वर्षांमध्ये तन्वीच्या कामाचा आलेख वाढता वाढत आहे. तिच्याकडे ८ वर्षांचा कामाचा अनुभव गाठीशी आहे. कामातील सातत्य आणि अनुभवाच्या जोरावर तिने मेकअप आर्टिस्ट म्हणून मोठे नाव कमावले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी ‘टाईम्स ऑफ इंडियाशी’ बोलताना तिने सांगितले की, मेकअप करणे हे केवळ माझ्यासाठी काम नसून, तर एक प्रकारचे समाधान आहे. जे क्लायंटला हवा तसा लूक आणि मेकअप केल्यावर मला मिळते.

तन्वी पुढे म्हणते की, या क्षेत्रातील नवनवीन ट्रेंड्स आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर मी माझ्या कामात आवर्जून करते. कोणताही ग्लॅमरस रेड कार्पेट असो किंवा सेलिब्रिटींचे स्पेशल इव्हेंट लूक असो ती प्रत्येक कार्यक्रमासाठी सेलिब्रिटींचा बारीक डिटेलिंगसह उत्तम मेकअप करते.

अगदी त्यांना हवा तसा मेकअप करण्यावर तिचा भर असतो. कामातील अनुभव आणि आत्मविश्वासामुळेच तिला अभिनेत्री अनन्या पांडेपासून ते सारा अली खानपर्यंत आणि ईशा अंबानीपासून ते नीता अंबानींपर्यंत या सर्वांचे मेकअप करण्याची संधी मिळाली आहे,

तन्वीचा प्रेमळ स्वभाव

तन्वी तिच्या कामाच्या बाबतीत एकदम परफेक्ट आहे. परंतु, यासोबतच तिच्या स्वभावाचे देखील नेहमीच कौतुक होताना दिसते. ग्राहकांच्या लूकसाठी प्राधान्य देणे आणि त्यांना हवा तसा मेकअप करण्यावर तिचा भर असतो. काही वेगळा लूक असेल आणि त्याला मेकअपचा अनोखा टच द्यायचा असेल, तर ती त्याप्रमाणे वेळ काढून अभ्यास देखील करते. कामातील सातत्य, अनुभव आणि क्लायंटसोबत लगेच कनेक्ट होण्याची तिची क्षमता यामुळे ती सेलिब्रिटींची आवडती मेकअप आर्टिस्ट बनली आहे.

तन्वीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने आतापर्तंय अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचे मेकअप केले आहेत. यामध्ये जान्हवी कपूर, खुशी कपूर, सारा अली खान, रश्मिका मंदाना, सोनम कपूर आणि राणी मुखर्जीचा देखील समावेश आहे.

यासोबतच अंबानी कुटुंबाची ती आवडती मेकअप आर्टिस्ट आहे. तिने नुकतेच अनंत-राधिकाच्या लग्नात आणि लग्नापूर्वीच्या सोहळ्यांमध्ये नीता अंबानी, ईशा अंबानी, श्लोका मेहता-अंबानी आणि राधिका मर्चंटचा देखील मेकअप केला आहे. याबदद्लचे अपडेट्स ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT