लाइफस्टाइल

होम डेकॉर  : बेडरूमची सजावट

इरावती बारसोडे

बेडरूम किंवा झोपायची खोली आपल्याला ‘रिलॅक्स मूड’मध्ये जाण्यासाठी मदत करते. दिवसभराच्या दगदगीनंतर आपण याच खोलीत येऊन विश्रांती घेतो आणि निद्रादेवीच्या अधीन होतो. शांत झोप झाली, तरच उद्याचा दिवस उत्साहात उगवतो!

लेअर बेडिंग
सकाळी उठल्यानंतर आपला पलंग आवरताना लेअर बेडिंग केल्यास पलंग छान दिसतो. लेअर बेडिंग म्हणजे एकावर एक चादरी घालून आणि उश्या वापरून केलेली सजावट. आपल्याकडे फारशी थंडी नसते, त्यामुळे फार लेअरिंग करायची गरज नाही. गादीवर एक छानशी चादर घालावी. त्यावर ब्लँकेट किंवा रजई आधी पूर्ण पसरावी व नंतर वरून एक चतुर्थांश दुमडावी. रजईबरोबर आणखी एखादी चादर वापरली तर दुमडल्यावर आणखी छान दिसते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पलंगाच्या खालच्या टोकाला चादर आणि रजई दोन्ही घट्ट खोचून टाकावे. वर फोल्ड केलेल्या भागामध्ये आधी मोठ्या उश्या भिंतीला/हेडबोर्डला उभ्या करून ठेवाव्यात. त्यांच्या पुढे वेगवेगळ्या आकारांच्या छोट्या, चौकोनी उश्या ठेवाव्यात. उश्‍यांचा अतिरेकही करू नये. हे सर्व करताना चादर, रजई आणि उश्‍यांचे अभ्रे यांचे रंग कॉम्प्लिमेंटरी असावेत.

काही टिप्स

  • हल्ली बहुतांश घरांमध्ये हायड्रॉलिक बेड्सना पसंती दिली जाते. हायड्रॉलिक बेड्समध्ये भरपूर स्टोरेजही मिळते आणि ते अगदी लहान मुलांनाही उचलण्यासाठी सोपे असतात.
  • पलंगाच्या डोक्यापाशी हेडबोर्ड असतो. त्यामध्ये लाकडी, कुशन्स असलेला, असे अनेक प्रयोग करता येतील. आपल्या आवडीनुसार त्याची सजावट करता येईल. 
  • हेडबोर्डऐवजी टेपेस्ट्री किंवा सोप्या भाषेत जाड पडदादेखील सोडता येईल.
  • सोफा कम बेड असेल, तर लोड आणि उश्या वापरून टेकून बसण्यास योग्य रचना करता येईल.
  • बेडरूमध्येही बसण्यासाठी एक छोटा कोपरा असावा. खुर्ची-टेबल असेल तर उत्तम; पण मोठ्या खिडक्या असतील (फ्रेंच विंडो) तर खिडक्यांच्या शेजारी छानशी सीटिंग अॅरेंजमेंट करता येईल.
  • पलंगाच्या बाजूला नाइट स्टँड असावा. किरकोळ गोष्टींबरोबरच पुस्तके, नाइट लॅम्प वगैरे ठेवण्यासाठी उपयोगी पडतो. तोही आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार करून घेता येतो. 
  • पलंगावर आडवे झाल्यानंतर आपल्याला छत दिसते, जिकडे एरवी आपले लक्ष जात नाही. त्यामुळे तिकडे पाहून शांत वाटेल, असा रंग छताला द्यावा. 
  • पलंगाभोवती मोकळी जागा असावी. पलंगाला लागून मोठे फर्निचर असू नये. 
  • बेडरूममध्ये स्लायडिंग दरवाजांची कपाटे असल्यास जागा वाचते. 
  • बेडरूममधील लायटिंगही महत्त्वाचे आहे. बेडसाइड लॅम्प्सच्या बरोबरीने डिमर स्विचेसचाही वापर करावा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT