Ashadhi Ekadashi 2024 : pandurang vitthal story in marathi esakal
लाइफस्टाइल

Ashadhi Ekadashi 2024 : रूक्मिणी रूसली अन् द्वारकाधीश श्रीकृष्ण पंढरीनगरीत येऊन पांडुरंग झाले!

Story of Lord Panduranga: पंढरपुरात विठ्ठल रूक्मिणीची मूर्ती एकाच मंदिरात का नाही?

Pooja Karande-Kadam

Vitthal Rukmini story : दोन दिवसांवर आषाढी एकादशी आली आहे. आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांची मांदियाळी. विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन भक्त पंढरीनगरीत दाखल झाले आहेत. पांडुरंगाला जगाचा उद्धार करणारी माऊली असं म्हणतात. विठोबाच्या चरणावर मस्तक ठेऊन भक्त अगदी धन्य होतात.

विठ्ठलाला श्री विष्णूंचा अवतार म्हटले जाते. पण ते महाराष्ट्रात कसे आले. भक्त पुंडलिकासाठी ते २८ युगे एकाच विटेवर ऊभे राहिले हे तर आपल्याला माहितीच आहे. पण खरी गोष्ट अशी की, श्री कृष्ण अवतारात असताना भगवान विष्णू पंढरीनगरीत येण्यामागे एक वेगळीच कथा आहे. ती काय आहे, कोणाचा रूसवा काढण्यासाठी देव आपल्या राज्यात आहे यामागची कथा जाणून घेऊयात.

स्कंद पुराण आणि पद्म पुराणात असे सांगितले गेले आहे की, द्वारकाधीश श्रीकृष्ण रुक्मिणीच्या शोधार्थ पंढरपुरात आले आणि श्री पांडुरंगाच्या रूपाने येथेच उभे राहिले. भगवान श्रीकृष्ण हेच ब्रह्मदेवाच्या रूपाने सृष्टी निर्माण करतात, विष्णुरूपाने तिचे पालन करतात व शिवरूपाने त्या सृष्टीचा संहार करतात.

एका पौराणिक कथेनुसार, श्रीकृष्णांची एका कल्पातील अशी एक लीला सांगण्यात येते की, एकदा श्रीमती राधाराणी श्रीकृष्णास भेटावयास श्रीधाम द्वारका येथे आली. आपली प्रिय सखी श्री राधेला पाहून श्रीकृष्णांना अत्यानन्द झाला. इतक्या दिवसांच्या विरहानंतर श्रीराधा आणि श्रीकृष्णांची भेट होत होती.

त्यामुळे दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी व्याकुळ होते. प्रेमावेशाने श्रीकृष्णांनी श्रीमती राधाराणीला आपल्या जवळ बसविले आणि तेव्हाच श्रीमती रुक्मिणी देवीने त्या महालात प्रवेश केला. राधाराणीला श्रीकृष्णांच्या इतक्या निकट बसलेले पाहून रुक्मिणी देवी श्रीकृष्णावर नाराज झाली आणि रुसून महाराष्ट्रातील पंढरपूर येथील दिंडीरवनात आली.

भगवंत श्रीरुक्मिणीला शोधीत या क्षेत्री आले आणि नंतर त्यांनी श्री पुंडलिकाला दर्शन दिले. हे क्षेत्र अनादी काळापासून पुण्यस्थळ आहे. याबाबतीत अशी कथा सांगण्यात येते. पार्वतीने भगवान शंकरांना विचारले,

श्रीरुक्मिणी द्वारकेतून निघून गेल्याने श्रीकृष्ण दुःखी झाले. ते तिला सगळीकडे शोधू लागले. फिरत फिरत ते गोकुळात आले. मग आपल्याबरोबर गाई व गोप घेऊन शोधत शोधत दक्षिणेत आले. गाई व गोपांना मागे ठेवून श्रीरुक्मिणीला शोधण्यासाठी श्रीकृष्ण दिंडीरवनात आले.

या वनाला तिण्डिरवन असेही म्हणतात. 'तिण्डीर' म्हणजे चिंच. भगवान कृष्णानी श्रीरुक्मिणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु आजही रुक्मिणी भगवंतांवर रुसून उभी आहे.

म्हणूनही आपण पाहू शकतो की, श्रीपंढरपूर हे एकमेव असे क्षेत्र आहे जेथे श्रीरुक्मिणी आणि श्रीपांडुरंग एका ठिकाणी नसून दोघे दोन वेगळ्या ठिकाणी आहेत.

माता रूक्मिणींचे जन्मस्थान कुठे आहे?

रुक्मिणी देवी विदर्भराज भीष्मक यांची कन्या आहे. विदर्भ महाराष्ट्राचा भाग आहे. रुक्मिणीच्या जन्मस्थानाबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. त्यांचे जन्मस्थान आहे 'कौण्डिण्यपूर'. श्रीमद्भागवतात कौण्डिणपुराचा उल्लेख येतो.

हे स्थान विदर्भातील अमरावती जिल्ह्यात, शहरापासून ४० कि.मी. अंतरावर आहे. कौण्डिण्यपूर ही भीष्मक राजाची राजधानी असून 'वरदा' नदीच्या काठी वसलेली आहे. या नदीस 'वरदायिनी' असेही म्हणतात.

येथेच श्री अंबाबाईचे मंदिर आहे. त्या ठिकाणाहून श्रीकृष्णांनी रुक्मिणीस पळवून नेले होते. अशी ही भीष्मकनंदिनी रुक्मिणी 'वैदर्भी' या नावानेही प्रसिद्ध आहे. याच पावनतीर्थ क्षेत्री आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाचा 'विदर्भाचा गौरव' या नावाचा खूप मोठा प्रकल्प सुरू असून मंदिरही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आम्हाला विचारात घेत नाहीत, अजितदादा ITवाल्यांचं ऐकतात, बैठकीलाही बोलावत नाहीत; हिंजवडीच्या सरपंचांचे गंभीर आरोप

Jasprit Bumrah: कसे असेल बुमराचे भवितव्य, आशिया कपमध्ये खेळणार नाही? गंभीर - आगरकरसमोर मोठं आव्हान

IND vs ENG 5th Test: खोटारडे! यशस्वीसमोर स्पिनर आणायला घाबरला ऑली पोप, अम्पायरशी बोलला खोटं, पाहा Video

Latest Maharashtra News Updates Live: बीड, पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतीच; लोकांना न्याय मिळत नसल्याची खंत - सुप्रिया सुळे

Malegaon Crime : मालेगावात गुन्हेगारीचा सुळसुळाट! किरकोळ वादातून तरुणाचा खून

SCROLL FOR NEXT