Ashadhi Ekadashi 2024 :  esakal
लाइफस्टाइल

Ashadhi Ekadashi 2024 : विठू माऊली तू, माऊली जगाची..! आषाढी एकादशीनिमित्त पाठवा 'या' खास शुभेच्छा

Ashadhi Ekadashi 2024 : आज सर्वत्र आाषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Ashadhi Ekadashi 2024 : आज सर्वत्र आाषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीचे खास असे महत्व आहे. वर्षभरातील सर्व एकादशींपैकी ही आषाढी एकादशी सर्वात मोठी आणि महत्वाची मानली जाते. त्यामुळे, या आषाढी एकादशीला महाएकादशी असे म्हटले जाते. आषाढी एकादशीचे हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. विठ्ठल हे भगवान विष्णूचेच रूप आहे.

आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात चंद्रभागेच्या काठावर वैष्णवांचा मेळा भरला असून वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. आज अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय झाला आहे. आषाढी एकादशीनिमित्त आम्ही तुम्हाला तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना किंवा मित्र-परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छा संदेश आणि फोटोंबद्दल माहिती देणार आहोत. या आषाढीच्या शुभेच्छा तुम्ही नक्कीच त्यांना पाठवू शकता.

Ashadhi Ekadashi 2024 :

सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे! आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा..!

हेची दान देगा देवा

तुझा विसर न व्हावा

देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..!

Ashadhi Ekadashi 2024 :

विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत, पाहताच होती दंग आज सर्व संत, आषाढी एकादशीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई,

सुखालाही आला या हो आनंदाचा पूर,

चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर,

आषाढी एकादशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!

Ashadhi Ekadashi 2024 :

चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

सण आला पंढरीचा, सोहळा जमला आषाढी वारीचा

मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT