Ashtami October 2024: Sakal
लाइफस्टाइल

Ashtami October 2024: नवरात्रीत अष्टमी -नवमी कधी साजरी केली जाणार? जाणून घ्या तारीख, वेळ अन् महत्व

Ashtami October 2024: यंदा नवरात्रीत अष्टमी आणि नवमी कधी आहे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Ashtami October 2024: यंदा शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. यासोबतच नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा करण्याची परंपरा आहे. यासोबतच अष्टमी आणि नवमी तिथीला माता दुर्गेची विधीवत पूजा करून उपवास तोडला जातो.

मात्र यंदा नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीबाबत थोडा गोंधळ आहे. यावेळी काही तारखा दुपारपासून सुरू होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी संपत आहेत. त्यामुळे अष्टमी आणि नवमी या तिथींबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. जाणून घ्या नवरात्री अष्टमी आणि नवमी कधी आहे.

अष्टमी आणि नवमी कधी आहे

हिंदू पंचांग नुसार, अश्विन शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी 10 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12:31 वाजता सुरू होईल आणि 11 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12:06 वाजता समाप्त होईल. यानंतर नवमी तिथी सुरू होईल, जी 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:57 वाजता समाप्त होईल. अशावेळी नवरात्रीमधील अष्टमी आणि नवमी हे 11 ऑक्टोबर 2024 ला साजरी केली जाणार आहे.

कन्यापूजनाचा शुभ मुहुर्त

महाष्टमीला कन्यापूजन करावे. 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 07:47 ते 10:41 पर्यंत करता येईल. यानंतर, दुपारी 12:08 ते 1:35 पर्यंत करता येईल.

राहुकाल- रात्री 10:41 ते रात्री 12:08 पर्यंत असेल.

अष्टमी आणि नवमीचे महत्त्व

हिंदू धर्मात नवरात्रीत अष्टमी आणि नवमीला खास महत्व आहे. महाष्टमी हा नवरात्रीचा सर्वात शक्तिशाली दिवस मानला जातो, कारण या दिवशी माता दुर्गेच्या सर्वात शक्तिशाली रूपाची पूजा केली जाते. यासोबतच या दिवशी कन्यापूजन केले जाते. कन्यापूजनाला खास महत्व आहे. माता दुर्गेच्या महागौरी रूपाची महाअष्टमी आणि नवव्या दिवशी सिद्धिदात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे, असे मानले जाते की या दिवशी माता दुर्गेने महिषासुरमर्दिनीचे रूप धारण करून महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. या दिवशी अनेक भक्त हवन वगैरे करून उपवास सोडतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT