Astro Tips  esakal
लाइफस्टाइल

Astro Tips : उशाखाली एक रूपयाचे नाणे ठेवल्याने आर्थिक परिस्थिती सुधरेल का? वाचा काय म्हणतं ज्योतिषशास्त्र

एक रुपयाचे नाणे उशीखाली ठेवून झोपण्याचे अनेक फायदे

Pooja Karande-Kadam

Astro Tips :  आजकाल जगातील एक तृतियांश लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाढत चाललेली बेरोजगारी, नोकऱ्यांची कमतरता यामुळे अनेक लोक पैशांचा विचाराने झोपूही शकत नाहीत. तुम्हालाही सतत पैशांच्या अडचणी येत असतील. तर, काही उपाय करून तुमच्या पैशांच्या अडचणी दूर होऊ शकतील.  

झोपताना सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक पद्धती सुचविल्या आहेत. पर्यावरणशास्त्रज्ञ म्हणतात की रात्री झोपताना काही गोष्टी केल्याने सकारात्मक उर्जेच्या फायदेशीर प्रभावामुळे आपले जीवन सुधारू शकते. परिणामी जीवनातील अनेक प्रश्न सुटू शकतात.

ज्योतिषशास्त्राने रात्री झोपताना एक रुपयाचे नाणे उशीखाली ठेवण्याची शिफारस केली आहे. एक रुपयाचे नाणे उशीखाली ठेवून झोपण्याचे अनेक फायदे आहेत. जर तुम्ही आर्थिक संकटाशी झुंजत असाल, कर्जाचा डोंगर असेल तर आणि तुम्हाला पैसे कमवण्याचे नवीन मार्ग सापडत नसतील. तर 1 रुपयाच्या नाण्याची ही युक्ती असेल तुमच्यासाठी खूप उपयुक्त.. झोपताना हे नाणे उशीखाली ठेवायला सुरुवात करा.

झोपताना उशीखाली 1 रुपयाचे नाणे ठेवण्याचे फायदे

रात्री झोपताना स्वच्छ पलंगावर उशीखाली एक रुपयाचे नाणे ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर हे नाणे एखाद्या गरीबाला दान करा. असे मानले जाते की जर तुम्ही हे नियमित केले तर तुमच्या आर्थिक समस्या हळूहळू दूर होतील.

जर तुम्ही हे रोज केले तर तुमच्यासमोर कमाईचे नवीन मार्ग खुले होतील. अनेक मार्गांनी कमाई केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.

एक रुपयाच्या नाण्याने लक्ष्मीची पूजा करा

तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये एक नाणे अर्पण करा. मातीच्या दिव्यात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि देवीला संकट टळून जाण्यासाठी देवीकडे प्रार्थना करा. देवीसमोर हात जोडून उभे असताना हे नाणे तुमच्या हातातच राहूद्यावे. या उपायामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि त्यांच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT