Astro Tips esakal
लाइफस्टाइल

Astro Tips : दुसऱ्याची साडेसाती मागे लावून घ्यायची नसेल तर, कधीच कोणाकडून उधार घेऊ नका या गोष्टी

दुसऱ्याचे घड्याळ कधीच घालायला घेऊ नका

Pooja Karande-Kadam

Astro Tips : कधीकधी आपल्याला काहीतरी तातडीने हवे असते. त्यावेळी आपण ही वस्तू कोणाकडून तरी उधार घेतो आणि परत करतो. जीवनात अशा गोष्टींची देवाणघेवाण होणे आवश्यक आहे, परंतु असे आंधळेपणाने करणे चुकीचे आहे.

तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्या उधार घेऊ नयेत. अशा गोष्टींमुळे लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

कोणाचाही पेन घेऊ नका

पेन ही एक महत्त्वाची वस्तू आहे. जेव्हा आपल्याजवळ पेन्सिल किंवा पेन नसतो तेव्हा आपण ते कोणाकडून तरी बिनदिक्कत मागतो. ज्योतिषशास्त्रानुसार कोणाचीही लेखणी घेणे चुकीचे आहे. त्यामुळे जीवनाची प्रगती मंदावते. त्यामुळे नेहमी स्वत:चा पेन सोबत ठेवा.

अंगठी

अंगठी पुरुष आणि स्त्रिया दोघेही परिधान करतात. काही लोक अंगठीत रत्नही घालतात. एखाद्याच्या अंगठीची डिझाईन आवडली म्हणून किंवा आपल्याकडे नाही म्हणून कधीही उधार घेऊ नये. असे केल्याने आर्थिक संकट येऊ शकते.

कंगवा

अनेक पुरुष खिशात छोटी कंगवा ठेवतात. तुमचा वापरलेला कंगवा कधीही कोणाला देऊ नका किंवा दुसऱ्याचा वापर करू नका. असे केल्याने तुमच्या भविष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

कपडे

केवळ ज्योतिषशास्त्रातच नाही तर वैद्यकशास्त्रातही इतर लोकांचे कपडे वापरू नका असे सांगितले आहे. त्या व्यक्तीचे काही संसर्गजन्य आजार तुम्हाला होऊ शकतात. असं म्हणतात की जर तुम्ही दुसऱ्याचे जुने कपडे घातले तर नशीब तुम्हाला साथ देत नाही.

घड्याळ 

काही लोकांना मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून घड्याळे उधार घेण्याची सवय असते. ज्योतिषशास्त्रानुसार काळाचा संबंध व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट काळाशी असतो. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचे घड्याळ घेतात तेव्हा त्याचा वाईट काळही तुमच्यावर येतो. त्यामुळे दुसऱ्याचे घड्याळ वापरणे चुकीचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT