World Heart Care Sakal
लाइफस्टाइल

World Heart Care 2024: पूर्ण झोप अन् ध्यानाने टाळा हृदयविकार, वाचा तज्ज्ञ काय सांगतात

World Heart Care 2024: योग्य आहार, व्यायाम, ध्यानधारणा आणि योगाने हृदयविकाराचा धोका टाळता येणे शक्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

सकाळ वृत्तसेवा

World Heart Day 2024: मागील काही वर्षांत हृदयविकाराच्या रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. विशेषत: बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांपैकी सुमारे ४० टक्के हे तरुण असतात. परंतु, योग्य आहार, व्यायाम, ध्यानधारणा आणि योगाने हृदयविकाराचा धोका टाळता येणे शक्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

मागील काही वर्षांत माणसाची बदललेली जीवनशैली, ताणतणाव, व्यसनांचे वाढते प्रमाण, व्यायामाचा अभाव, फास्ट फूड, जंक फूडच्या सेवनाचे वाढते प्रमाण, यामुळे हृदयविकाराचे रुग्ण वाढत आहेत. एखाद्या रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये हृदयविकाराने ग्रस्त शंभर रुग्ण येत असतील तर यापैकी ४० रुग्ण हे तरुण असतात. म्हणजेच ४५ वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात, असे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. परंतु, जीवनशैलीत बदल करून फास्ट फूड, जंक फूडचे सेवन टाळत, ताणतणाव कमी करण्यासाठी योगा, ध्यानधारणा, व्यवस्थित झोप, योग्य व्यायाम विशेषत: ३० ते ४५ मिनिटे रोज स्वतःसाठी दिल्यास हृदयविकार टाळता येणे शक्य आहे.

ध्यान ठरते महत्त्वाचे

आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव हा माणसाच्या आयुष्याचा घटक बनला आहे. हा ताणतणाव दूर ठेवण्यासाठी नियमित ध्यान करणे महत्त्वाचे ठरते. मग तुम्ही ध्यान करा किंवा विपश्यना याने ताणतणाव कमी करण्यास मदत होते. हृदयालाही याचा लाभ होतो.

बदललेली जीवनशैली, ताणतणाव, फास्ट फूड, जंक फूडचे सेवन या कारणाने हृदयविकाराचे रुग्ण वाढत आहेत. अशा त्रास असणाऱ्या एकूण रुग्णांपैकी सुमारे ४० टक्के तरुण असल्याचे निदर्शनाला येते. योगा, ध्यानधारणा करून ताणतणाव दूर ठेवत, पूर्ण झोप, योग्य आहार, व्यायाम केल्यास हृदयविकार टाळता येतो.

- डॉ. तुषार निकम, हृदयविकार तज्ज्ञ.

काय करू नये?

आहारात तेल, तूप, तेलकट पदार्थ, गोड पदार्थ, मीठ याचे प्रमाण कमी ठेवावे

मद्यपान, धूम्रपान करू नये.

जास्त व्यायाम टाळावा.

काय करावे

आहारात हिरव्या पालेभाज्या, सलाड वाढवावे.

कोलेस्टेरॉल, बीपी, शुगर नियंत्रणात ठेवावे.

कुठलाही त्रास नसला तरी नियमित तपासणी करावी.

रोज सहा ते आठ तास झोप घ्यावी.

रोज पायी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

SCROLL FOR NEXT