Electric Car Tips:  Sakal
लाइफस्टाइल

Electric Vehicle Range Tips: 'या' चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज

Electric Vehicle Range Tips: तुमच्याकडे इलेक्ट्रिक कार असेल तर त्याची रेंज कशी वाढवावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

avoid these mistakes reduce range of electric car

जगभरात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. अनेक कंपन्या जास्त रेंज असलेल्या कार बाजारात लाँच करत आहे. पण तुमची इलेक्ट्रिक कार अधिक चांगली रेंज देत असली तरीही काही चुकांमुळे रेंज कमी होऊ शकते. या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

कारचा जास्त वेग

इलेक्ट्रिक कारची चांगली रेंज मिळवायची असेल तर कारचा वेग नियंत्रणात ठेवावा. इलेक्ट्रिक गाडी जास्त वेगाने चालवली तर रेंज कमी होऊ शकते. असे वाहन जास्त वेळ वापरल्यानेही बॅटरी खराब होते आणि बॅटरी लवकर संपु शकते. यासोबतच कारवरही विपरीत परिणाम होऊन नुकसान होण्याचा धोका वाढतो.

फास्ट चार्ज करणे

तुम्ही इलेक्ट्रिक कारमध्ये सतत फास्ट चार्जर वापरत असाल तर बॅटरीचे नुकसान होऊ शकते. असे केल्याने, कार चालवताना बॅटरीच्या क्षमतेवर परिणाम होतो आणि परिणामी बॅटरीची रेंज कमी होऊ शकते. शक्य तितक्या सामान्य चार्जरने इलेक्ट्रिक कार चार्ज करावी. याच्या मदतीने बॅटरीचे आयुष्य आणि रेंज अधिक काळ टिकवून ठेवता येते..

जास्त सामान

जर तुम्ही इलेक्ट्रिक कार चालवत असाल आणि तुम्हाला त्यातून चांगली रेंज हवी असेल तर तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त सामान घेऊन कधीही प्रवास करू नका. अनेक वेळा लोक त्यांच्या इलेक्ट्रिक कारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त सामान ठेवतात किंवा काही वेळा ते क्षमतेपेक्षा जास्त लोक बसवतात. त्यामुळे देखील कारची रेंज कमी होऊ शकते.

बॅटरीचा पुर्ण वापर करणे

इलेक्ट्रिक कारची बॅटरी पूर्णपणे संपेपर्यंत वापरू नका. जेव्हा गाडीची बॅटरी 10 ते 20 टक्के राहते तेव्हा कार चार्ज करावी. असे केल्याने बॅटरीची रेंज टिकून राहण्यास मदत होते. पण ती वारंवार चार्ज केली तरी बॅटरी खराब होते आणि रेंज कमी होऊ शकते.

सर्व्हिसिंग न करणे

इलेक्ट्रिक कारची सर्व्हिंसिग वेळेवर करावी. यामुळे कारचे आणि बॅटरीचे आयुष्य वाढते. तसेच इलेक्ट्रिक कारच्या टायरची देखील काळजी घ्यावी.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: काव्या मारनच्या संघात ३००+ विकेट्स घेणारा खेळाडू दाखल; KKRनेही विदर्भच्या पोट्ट्यासाठी मोजले लाखो

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा ठाणेकरांना दिलासा! १०० कोटींची देणी थकीत, अनेक महत्त्वाच्या गोष्टींची तरतूद; वाचा सविस्तर

Latest Marathi News Live Update : इगतपुरी तालुक्यात पुन्हा अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची घटना

प्रीपेड वीजबिल वसुलीची ‘सरकारी एन्ट्री’! वीजजोडण्या बदलण्यास ऊर्जा विभागाची मंजुरी

Kedarnath Yatra: केदारनाथ यात्रेकरूंना मोठे गिफ्ट! १३ वर्षांनंतर रामबाडा-गरुडचट्टी मार्ग 'रेडी'; आपत्तीच्या काळात ठरणार 'लाईफलाईन'!

SCROLL FOR NEXT