coconut oil esakal
लाइफस्टाइल

Beauty Tips: नारळाचे तेल नैसर्गिक मॉश्चरायझर ? वाचाल तर नक्की ट्राय कराल !

बॉलिवुडमध्ये काम म्हणजे सतत मेकअप करावा लागतो.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवुडमध्ये काम म्हणजे सतत मेकअप करावा लागतो. त्यामुळे मुळ चेहरा खराब होण्याची शक्यता जास्त असते. पण, तीन बाळांना जन्म दिल्यानंतरही बॉलिवूडची अभिनेत्री लिजा हेडनचे ग्लॅमरस सौंदर्य तसूभरही कमी झालेले नाही. चमकदार त्वचेसाठी ती कोणत्याही कॉस्मेटीकचा वापर करत नाही. त्यासाठी ती घरगुती उपाय करते. तिचे सौंदर्य टिकवण्यासाठी ती काय नुख्सा वापरते. तिचे सिक्रेट काय आहे हे पाहुयात. 

नारळाचे तेल नैसर्गिक मॉश्चरायझर म्हणून काम करते.  नारळ तेलाच्या गुणधर्मांमुळे ते केवळ केसांसाठीच नाही तर सौंदर्य प्रसाधने आणि DIY रेसिपीमध्ये देखील वापरले जाते. नारळाचे तेल मॉइश्चरायझर तर आहेच पण त्याचसोबत ते केसाचे डॅंड्रफपासून बचाव करून केसांना भरपूर पोषण देते. नारळ तेल हे व्हायरल आजारांपासून रक्षण करते.

ओठ कोरडे पडले तर..

तूमचे ओठ फाटलेत आणि तूम्ही त्यावर सतत लिप बाम लावत आहात. तरीही काही फरक पडत नसेल. तर, लीजा हेडनकडे एक उपाय आहे. तो असा की, १ चमचा खोबरेल तेल, अर्धा चमचा साखर आणि चिमूटभर कोको पावडर घ्या. याची पेस्ट करा. आणि आपल्या ओठांवर लावा. हलक्या हाताने गोलाकार फिरवत स्क्रब करा. 10 मिनिटे ठेवा आणि धुवून टाका. ओठ कोरडे करून कोणताही लिप बाम लावा. याने ओठावरील मृत त्वचा काढण्यास मदत होईल. 

चेहऱ्याकरता फेसपॅक कसे तयार करावे?

पार्लरमध्ये जाऊन तासंतास बसून चेहऱ्यावर ग्लो आणणं तस खर्चिक आणि वेळखाऊ आहे. यासाठीच नारळ तेल आणि एवोकॅडो पासून बनवलेला फेस मास्क तुम्हाला झटपट चमक देईल. हा मास्क बनवण्यासाठी 1 चमचे मॅश केलेला एवोकॅडो, 1 चमचे खोबरेल तेल आणि गुलाब पाण्याचे काही थेंब मिक्स करा. हा पॅक तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेच्या भागावर लावा. 15-20 मिनिटे तसाच ठेवा. कोमट पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर हलके मॉइश्चरायझर लावावे.

कोरडे रूक्ष केसांकरता काय करावे?

भारतीय मातांच्या केसांना तेल लावण्यामध्ये नारळाचे तेल महत्त्वाची भुमिका बजावते. केसांना पोषण मिळण्यासाठी नारळ तेल हे असे आहे ज्यावर आपण पुर्ण विसंबून राहू शकतो.  तुम्ही ऑलिव्ह ऑईल, खोबरेल तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल एकत्र करून  केसांना लावा. तुमच्या हेअरकेअर रुटीनमध्ये हे तेल ऍड करा. यामुळे केसांना योग्य ते पोषण मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

कसोटी ते वन डे कर्णधार! रोहित शर्माला हटवून Shubman Gill ला पुढे आणण्याची Inside Story

DMart Shopping Tips : तुम्ही डिमार्टला जाता अन् बिल तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त येतं का? तर या टीप्स नक्की फॉलो करा

Nashik Kumbh Mela : कुंभमेळा कामे दर्जेदारच हवीत! गुणवत्ता आणि पारदर्शकतेबाबत मुख्यमंत्र्यांच्या सक्त सूचना

Latest Marathi News Live Update: लोणीमधील शेतकरी मेळाव्याला शाहांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT