Upper Lip Hair Remove Tips: नको असलेले केस अनेकदा स्त्रियांच्या चेहऱ्यावर डाग म्हणून काम करतात. अप्पर लिप्सच्या भागात अनवॉन्टेड केस खूप विचित्र दिसतात. यासाठी महिला दर काही दिवसांनी हे केस पार्लरमध्ये जाऊन वॅक्स किंवा थ्रेडिंगद्वारे काढतात.
मात्र, अनेक वेळा महिलांना पार्लरमध्ये जाण्यात अडचण येते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला आज अशाच काही नैसर्गिक टिप्सची माहिती देत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही घरी बसल्या नको असलेल्या केसांपासून मुक्ती मिळवू शकता.
हळद आणि दुधाचे मिश्रण- हळद आणि दूध एकत्र करून घट्ट पेस्ट तयार करा. शक्य असल्यास त्यात थोडे मधही घालावे. ही पेस्ट ओठांच्या वरच्या भागावर लावा. 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. पूर्ण सुकल्यावर कोमट पाण्याने धुवा. यामुळे केसांची वाढ मंद होईल.
लिंबू आणि साखरेचा वॅक्स - तुम्ही घरी लिंबू आणि साखरेचा वॅक्स तयार करू शकता. यासाठी दोन चमचे साखर, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा पाणी मिसळून वॅक्स तयार करा. चिकट पेस्ट तयार होईपर्यंत हे मिश्रण गरम करा. जेव्हा ते थोडेसे थंड होते, तेव्हा ते स्पॅटुलाच्या किंवा बोटांच्या मदतीने ओठांवर लावा.
मध आणि लिंबू- अप्पर लिप्सचे नको असलेले केस मध आणि लिंबाच्या सहाय्याने देखील काढले जाऊ शकतात. यासाठी मध आणि लिंबू यांचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण केसाळ भागावर लावा. 15 मिनिटे कोरडे होऊ द्या.
यानंतर गरम पाण्यात सूती कापड भिजवा. पाणी पिळून काढा आणि मिश्रण लावलेल्या भागावर ठेवून ते काढून टाकण्याचा प्रयत्न करा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा असे केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल.
बेसनाचा मास्क- बेसनाचा मास्क नको असलेले केस काढण्यासही मदत करू शकतो. यासाठी दोन चमचे बेसन. एक चमचा दूध आणि चिमूटभर हळद एकत्र करून पेस्ट बनवा.
पेस्ट अप्पर लिप्सला लावा आणि पूर्णपणे कोरडे होऊ द्या. केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने ओल्या बोटांनी हलक्या हाताने चोळा. यामुळे त्वचा एक्सफोलिएट होईल आणि केसांची वाढ कमी होण्यास मदत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.