Bhagavad Gita Arjuna and Krishna best friends Arjuna said I don't want war sakal
लाइफस्टाइल

Bhagavad Gita : मला युद्ध नको!

बालमित्रांनो, अर्जुन हा श्रीकृष्णाचा आतेभाऊ होता‌. ते दोघं एकाच वयाचे असल्यामुळं त्यांच्यामध्ये अगदी मधुर मैत्रीचं नातं होतं

सकाळ वृत्तसेवा

बालमित्रांनो, अर्जुन हा श्रीकृष्णाचा आतेभाऊ होता‌. ते दोघं एकाच वयाचे असल्यामुळं त्यांच्यामध्ये अगदी मधुर मैत्रीचं नातं होतं

एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन।

अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते।।१.३५।।

बालमित्रांनो, अर्जुन हा श्रीकृष्णाचा आतेभाऊ होता‌. ते दोघं एकाच वयाचे असल्यामुळं त्यांच्यामध्ये अगदी मधुर मैत्रीचं नातं होतं. अर्जुन शूर, महारथी, योद्धा तर होताच, त्याचबरोबर अगदी निष्कपट, सरळ मनाचा, सद्‍गुणी होता. श्रीकृष्ण स्वतः भगवानच होते. अलौकिक दैवी गुण, सुंदरता, सामर्थ्यानं परिपूर्ण होता.

श्रीकृष्णाचं अर्जुनावर फार प्रेम होतं. अर्जुनानं विनंती करताच श्रीकृष्णानं त्यांचा रथ दोन्ही सेनांच्या मध्यभागी आणून उभा केला. अर्जुन पाहू लागला की आपल्या आणि कौरवांच्या सेनेमध्ये ज्यांना एकमेकांविरुद्ध लढायचे आहे आणि मी स्वतः ज्यांच्याशी लढायला सिद्ध झालो आहे, ते तर सगळे माझेच नातेवाईक आहेत. माझे गुरू द्रोणाचार्य, माझे आजोबा भीष्माचार्य, माझे मित्र, काका, मामा, माझे भाऊ असे सगळेच या युद्धामध्ये स्वतःच्या प्राणांची आहुती द्यायला तयार उभे आहेत.

अर्जुनाच मन करुणेनं भरून आलं. त्याला अतिशय दुःख झालं आणि तो श्रीकृष्णाला म्हणू लागला, ‘‘या सगळ्यांना मरायला लागणार असल्यास मला कुठलंच राज्य नकोय. श्रीकृष्णा, या सर्वांना मारून आम्हाला पापच लागणार आहे. या विचारांनी मी अत्यंत घाबरून गेलोय. मला उभं सुद्धा राहता येत नाहीये. पूर्ण शरीर कंप पावतंय. माझ्या पूर्ण शरीराचा दाह होतोय. माधवा, मी यांना मारणार नाही. मी युद्ध करणार नाही.’’ असं म्हणून अर्जुनानं हातातलं धनुष्य खाली टाकून दिलं आणि हाताश होऊन तो रथाजवळ बसून राहिला.

- श्रुती आपटे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT