Bookshelf Decoration Idea:
Bookshelf Decoration Idea: Sakal
लाइफस्टाइल

Bookshelf Decoration Idea: बोरिंग बुकशेल्फला द्या नवा लुक; फक्त लावा 'ही' झाडे...घरही राहील फ्रेश!

पुजा बोनकिले

how to styling bookshelf with plants

अनेक लोकांना घरात पुस्तक वाचणाची आवड असते. पुस्तके ठेवण्यासाठी खास बुकशेल्फ बनवतात. पण तीच बुकशेल्फ बोरिंग वाटत असेल तर हिरव्यागार झाडांनी सजवू शकता. यामुळे तुमच्या खोलीला आकर्षक लूक सुद्धा मिळेल. तसेच घरातील वातावरण देखील शुद्ध राहते.

  • मनी प्लांट

बुकशेल्फमध्ये मनी प्लँट ठेऊ शकता. याची जास्त काळजी घ्यावी लागत नाही. मनी प्लँटला जास्त सुर्यप्रकाशाची गरज नसते. मनी प्लँटमुळे तुमच्या बुकशेल्फचे सौंदर्य वाढेल.

  • स्नेक प्लँट

स्नेक प्लँट अतिशय टिकाऊ आणि मजबूत झाड आहे. या झाडाला सुर्यप्रकाश आणि पाण्याची जास्त गरज नसते. स्नेक प्लँट बुकशेल्फला एक अनोखा लुक देतात.

  • पीस लिली

पीस लिली हे एक सुंदर फुलांचे झाड आहे. यामुळे बुकशेल्फला नवा लूक मिळतो. पीस लीलीला सुर्यप्रकाशाची गरज नसते.

  • स्पायडर प्लँट

बुकशेल्फमध्ये स्पायडर प्लँट ठेवल्यास नवा लूक मिळतो. या रोपाला जास्त सुर्यप्रकाश आणि पाण्याची गरज नसते. यामुळे घरातील वातावरण देखील शुद्ध राहते.

  • एअर प्लँट

एअर प्लँट मातीमध्ये लावण्याची गरज नाही. तुम्ही साध्या भाड्यांमध्ये किंवा बुकशेल्फवर टांगू शकता. या झाडाला जास्त सुर्यप्रकाश आणि पाण्याची गरज नसते. त्याचबरोबर बुकशेल्फला नवा लूक देण्यासाठी ही झाडेही लावता येतील. जर घरात पाळीव प्राणी असतील तर झाडे लावताना काळजी घ्यावी.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT