Breakfast Recipe  esakal
लाइफस्टाइल

Breakfast Recipe : नाश्त्यासाठी बनवा पौष्टिक असे कणकेचे गोड थालीपीठ, रेसिपी सेव्ह करा उपयोगी येईल

Sweet Thalipeeth : हा पदार्थ तुमच्या ओळखीचा आहे. पण, तो तिखट बनवला जातो.

सकाळ डिजिटल टीम

Breakfast Recipe :

काही नाश्त्याचे पदार्थ आपण केवळ सकाळीच खाऊ शकतो. कारण, सायंकाळच्या वेळी हलका नाश्ता करून रात्रीचे जेवण जात नाही. त्यामुळे सायंकाळी लागलेल्या भुकेसाठी आज आपण कणकेचा एक गोड पदार्थ करणार आहेत.

हा पदार्थ तुमच्या ओळखीचा आहे. पण, तो तिखट बनवला जातो. पण आज आपण गोड थालीपीठ कसे बनवायचे हे पाहुयात. जे सायंकाळ न सकाळ दोन्ही वेळाला खाल्ले तरी पौष्टीक असल्याने मुलंही आवडीने खातात.

साहीत्य –

२ वाट्या कणीक, पाऊण वाटी पिठीसाखर, २ टे. स्पून पातळ वनस्पती तुपाचे मोहन, चिमूटभर सोडा

कृती :

- परातीत २ वाट्या कणीक व पाऊण वाटी पिठीसाखर घेऊन २ टे. स्पून वनस्पती तुपाचे गरम मोहन घालावे, चिमूटभर सोडा घालून कणीक घट्ट भिजवावी.

- कणकेचे ३ सारखे गोळे करावेत व पोळपाटावर तेलाचा हात लावून जाडसर पोळी लाटावी. मंद आचेवर तव्यावर तूप सोडून पोळी घालावी. हवे असल्यास मधे भोक पाडावे.

- तव्यावर पोळी घातल्यावर तूप सोडून झाकण ठेवावे. १ मिनिटाने झाकण काढावे. थालीपीठ चांगले फुगून येईल दुसऱ्या बाजूने उलटून तूप सोडून मंद गुलाबी आचेवर भाजावे

मधल्यावेळी झटपट पोटभरीचा प्रकार खायला करता येतो. थालीपीठ सर्व बाजूंनी गुलाबी भाजावे. जळू देऊ नये गुलाबी भाजले की खुसखुशीत लागते. करपले तर कडवट लागते व साध्या थालीपिठापेक्षा गोड थालीपीठ लवकर जळते म्हणून गॅस अगदी मंद ठेवावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT