business women central govt scheme mahila samriddhi yojana
business women central govt scheme mahila samriddhi yojana Sakal
लाइफस्टाइल

महिलांच्या ‘समृद्धी’साठी

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

महिला व्यावसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून महिला बचत गटांसाठी ‘महिला समृद्धी कर्ज योजना’ राबविण्यात येते. महिलांमधील उद्योजकतेला बळ आणि आर्थिक आधार देणारी ही योजना आहे.

राज्य सरकारमार्फत अल्पसंख्याक समाजातील महिलांना या योजनेअंतर्गत उद्योग सुरू करण्यासाठी आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ही योजना राबविण्यात येते. महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. योजनेमध्ये कर्जाचा व्याजदर हा चार टक्के आहे.

योजनेअंतर्गत कर्ज परतफेडीचा कालावधी तीन वर्षे आहे. बचत गटामार्फत ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना कर्जपुरवठा करणे हा योजनेचा हेतू आहे. या योजनेअंतर्गत महिलांना ९५ टक्के कर्ज नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स ॲण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून, तर ५ टक्के कर्ज राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येते.

महिलांना स्वत:चा लघुउद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक साहाय्य मिळणार असल्याने महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना अत्यंत महत्त्वाची आहे. योजनेमुळे महिलांचा सामाजिक, आर्थिक स्थितीसह जीवनमान उंचवण्यास मदत मिळणार आहे. महिला बचत गट समृद्धी कर्ज योजनेमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढणार आहे. महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार असून, त्या आत्मनिर्भर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. महिला बचत गट स्थापन होऊन किमान दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यास या योजनेचा लाभ संबंधित बचत गटास घेता येणार आहे.

योजनेचा उद्देश

  • महिलांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे

  • उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक साह्य करणे

  • महिलांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे

  • महिलांना व्यावसायिक सक्षम, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविणे

  • आर्थिकदृष्ट्या बळकट करणे

  • स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे

योजनेसाठी पात्रता

  • लाभार्थी महिला मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती, अल्पसंख्याक प्रवर्गातील असावी

  • महिला बचत गट लाभ घेण्यास पात्र

  • लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असावा

  • केवळ राज्यातील महिलांना योजना लागू

आवश्यक कागदपत्रे

  • जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, अर्ज आणि अन्य कागदपत्रे, व्यवसाय प्रकल्पाच्या खर्चाचे अंदाजपत्रक

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : https://nbcfdc.gov.in/loan-scheme-description/5/en

(संकलन : मीनाक्षी गुरव)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT