लाइफस्टाइल

ऑफिस मिटींगला जाण्यापूर्वी फॉलो करा 'या' महत्त्वपूर्ण गोष्टी

ऑफिस मिटींगला जाण्यापूर्वी फॉलो करा 'या' टीप्स;दूर होईल ताण

शर्वरी जोशी

महिन्याभराच्या कामाचा आढावा घेण्यासाठी किंवा एखादा नवा प्लॅन आखण्यासाठी प्रत्येक ऑफिसमध्ये महिन्यातून २ ते ३ वेळा हमखास मिटींग meeting घेतली जाते. मात्र, मिटींग म्हटलं की अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात. त्यातच एखादं प्रेझेंटेशन द्यायचं असेल किंवा तुमच्याकडून एखादी चूक झाली असेल तर ही मिटींग नकोशीच वाटते. त्यामुळे सहाजिकच मनावर एक प्रकारचं दडपण येतं. म्हणूनच, मिटींगला जाण्यापूर्वी मनावर आलेला ताण कसा कमी करावा ते जाणून घेऊयात. (career-and-money-how-to-be-stress-free-before-meeting)

१. परफ्युम लावा -

हो. ऐकायला हे कितीही विचित्र वाटत असलं तरीदेखील मिटींगला जाण्यापूर्वी सुगंधित अत्तर लावून जा. कारण, कोणत्याही मंद सुवासामुळे मनावर आलेला ताण कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे जर मिटींगला जाताना भीती किंवा स्ट्रेस जाणवत असेल तर लव्हेंडर, चंदन किंवा कोणतंही मंद सुवास देणारं अत्तर किंवा परफ्युम लावून जा.

२. डोक्याची मालिश -

अनेकदा टेन्शन आलं की डोकं दुखू लागतं. त्यामुळे एकीकडे मनावर ताण, त्यात डोकेदुखी यामुळे मिटींगमध्ये अजिबात लक्ष देता येत नाही. त्यामुळेच हलक्या हाताने कपाळ आणि डोक्याची मालिश करा. सोबतच हलक्या हाताने कानाच्या मागेही मसाज करावा. यामुळे कानामागील रिफ्लेक्सोलॉजी पॉइंट्स सक्रिय होतात आणि नर्व्हस सिस्टीमवरील ताण कमी होतो. असं केल्यामुळे डोकंदुखी बंद होऊन मनावरील भारदेखील हलका होईल.

३. गाणी ऐका -

मनावरील ताण कमी करण्याचा सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे गाणी ऐकणं. जर तुम्हाला मिटींगला जाण्याची भीती वाटत असेल. तर, त्यापूर्वी तुम्हाला आवडत असलेली गाणी नक्की ऐका. गाणी ऐकल्यामुळे आलेल्या टेन्शनचा आपल्याला काही काळासाठी विसर पडतो. वैज्ञानिकांच्या मते, ३- ते ५० बीट्सचा साऊंड ट्रॅक असलेल्या गाण्यामुळे मन:शांती मिळण्यास मदत होते.

४. विश्रांती घ्या -

ऑफिसच्या वेळात विश्रांती घेणं किंवा ५ मिनिटांची डुलकी घेणं हे खरं तर अत्यंत चुकीचं आहे. मात्र, एका संशोधनानुसार, टेन्शनच्या काळात तुम्ही काही काळासाठी झोप काढली किंवा एक लहानशी डुलकी घेतली तर तुमच्या मनावरील ताण निश्चितपणे कमी होतो. त्यामुळे मिटींगला जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डेस्कवर डोकं ठेवून ५-६ मिनिटे शांत पडू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT