Healthy Relationship Tips By Celebrity Nutritionist Rujuta Diwekar sakal
लाइफस्टाइल

Relationship Advice By Celebrity Nutritionist: फक्त खाण्यातलाच नाही तर नात्यातलाही गोडवा वाढवण्याचे सल्ले देतात 'सेलिब्रिटी पोषणतज्ञ रुजुता दिवेकर'

Healthy Relationship Tips By Celebrity Nutritionist Rujuta Diwekar: प्रसिद्ध पोषणतज्ञ रुजुता दिवेकर यांनी अलीकडेच नातेसंबंध सुधारण्यासाठी तीन सोपे आणि उपयोगी सल्ले सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Anushka Tapshalkar

How To Improve Relationship With Your Partner Naturally: प्रसिद्ध पोषणतज्ञ आणि लेखक रुजुता दिवेकर, या सतत सोशल मीडियावर आहाराविषयी, फिटनेस बद्दल छोटे छोटे सल्ले आणि माहिती देत असतात. पण त्याचसोबत त्या इतर दैनंदिन विषयांवर, जसेकी महिला सशक्तीकरण, वाढत्या वयातील मुलांचे आरोग्य त्यांच्यातील शारीरिक बदल यबद्दलही साधे आणि सोपे विचार मांडत असतात.

अशाचप्रकारे रुजुता दिवेकरांनी अलीकडेच एका वेगळ्या विषयासाठीचे तीन सोपे आणि उपयोगी सल्ले शेअर केले आहेत, जे त्यांच्या मते कोणत्याही नातेसंबंधात, विशेषतः नवरा-बायको यांच्यात, सुधारणा करू शकतात.

नेहमीप्रमाणेच त्यांची भाषा सोपी आणि थोडीशी मिश्कील होती. त्यांनी अशा काही सामान्य चुका सांगितल्या ज्या अनेकजण नकळत करतात आणि त्या नात्यांवर परिणाम करू शकतात. यासोबतच, त्यांनी असे सल्ले दिले जे समजायला सोपे आहेत आणि खरोखर उपयोगी ठरू शकतात.

हे सल्ले केवळ नवरा-बायकोसाठीच नाहीत, तर कोणतेही नाते अधिक चांगले आणि समजूतदार बनवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. चला तर मग हे सल्ले कोणते ते पाहूयात.

१. बायकांनी, नवऱ्याला "मी कशी दिसते?" असा प्रश्न विचारू नका.

रुजुता म्हणतात, "हे चुकीचे प्रश्न असतात, त्यामुळे याची योग्य उत्तरं असूच शकत नाहीत." स्वतःला कसं वाटतंय हे महत्त्वाचं, दुसऱ्याच्या मतावर अवलंबून राहू नका.

२. नवरे मंडळी, बायकोला काहीतरी “उत्तम” किंवा “शांतपणे” कसं करता येईल यावर सल्ला देण्याऐवजी तिचं कौतुक करा.

जर कौतुक शक्य नसेल, तर निदान तिच्या प्रयत्नांची दखल घ्या. आणि काहीच नाही जमलं, तरी सल्ला न देता गप्प बसा. हेच फार असतं.

३. जोडीदाराला ‘प्रोजेक्ट’ समजू नका.

नातं म्हणजे परिपूर्ण व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न नाही. त्याऐवजी एकमेकांच्या त्रुटी स्वीकारा, त्यात सौंदर्य पहा. रुजुता म्हणतात, “हीऱ्याची ओळख पारख्यालाच असते.”

रोजच्या जीवनात वापरता येतील असे हे सल्ले साधे असले तरी मोठा आणि सकारात्मक बदल घडवतात. जसं रुजुता साध्या आणि उपयोगी पद्धतीने आहाराबद्दल सांगते, तसंच तिने नातेसंबंधांवर दिलेला सल्लाही खरंच मनाला पटणारा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT