Childrens Day 2023
Childrens Day 2023  esakal
लाइफस्टाइल

Childrens Day 2023 : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनीच बालदिन का साजरा केला जातो?

Monika Lonkar –Kumbhar

Childrens Day 2023 : भारतात दर वर्षी १४ नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या दिवशीच हा बालदिन देशभरात साजरा केला जातो.

जगभरातील इतर देशांमध्ये बालदिन हा वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. मात्र, भारतात बालदिन हा १४ नोव्हेंबरलाच साजरा केला जातो. त्यानिमित्ताने देशभरातील शाळांमध्ये मुलांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आणि स्पर्धा ठेवल्या जातात.

परंतु, हा बालदिन १४ नोव्हेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त का साजरा केला जातो? हे तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊयात.

बालदिन १४ नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो ?

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलांबद्दल विशेष प्रेम होते. त्यांना नेहमीच लहान मुलांमध्ये रमायला आवडायचे. लहान मुले पंडितजींना आवडीने ‘चाचा नेहरू’ म्हणायची. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंनी लहान मुलांचे आणि तरूणांचे हक्क आणि त्यांच्या शिक्षणासाठी भरपूर काम केले होते.

लहान मुलांचे हक्क आणि तरूण यांना सर्व प्रकाराचे ज्ञान हे सहज प्राप्त होईल अशी शिक्षण प्रणाली निर्माण करण्याचे नेहरू हे पुरस्कर्ते होते. १९६४ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर त्यांचा वाढदिवस हा बालदिन म्हणून साजरा करण्याचा ठराव भारतीय संसदेमध्ये मंजूर करण्यात आला आणि तेव्हापासूनच त्यांचा जन्मदिन हा बालदिन म्हणून भारतात साजरा केला जातो.

बालदिन साजरा करण्यामागचा हेतू काय ?

बालदिन हा साजरा करण्यामागचा प्रमुख हेतू हा आहे की, लहान मुलांचे हक्क, अधिकार आणि शिक्षण याबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की, ‘आजची मुले ही उद्याचा भारत घडवतील, आपण ज्या प्रकारे त्यांचे पालनपोषण करू त्याप्रकारे आपल्या देशाचे भविष्य निश्चित होईल.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Latest Marathi Live News Update: नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडून मतदान केंद्रांच्या सुरक्षेचा आढावा

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

SCROLL FOR NEXT