नारळ दूध चहा  Sakal
लाइफस्टाइल

नारळाच्या दुधाचा चहा पिलात का? असे आहेत फायदे

सकाळ डिजिटल टीम

अनेकांच्या दिवसाची सुरवात ही चहापासूनच होते. चहा घेतलं की शरीराचा थकवा दूर होतो. अशीच अनेकांची मानसिकता आहे. दिवसातून किमान चार ते पाच वेळा चहा पिल्याशिवाय अनेकांना जमत नाही. त्यातही आरोग्याची काळजी घेणारे चहाप्रेमी ग्रीन टी, लेमन टी,ब्लॅक टी ला पसंती देतात. काही जणांना तर फक्त दूधातील तयार केलेला चहा प्यायला आवडतो. पण तुम्ही कधी नाराळच्या दूधाचा चहा पिला आहात का? नाही ना तर आज जाणून घेणार नारळ दूध चहा.

खरंतर नारळाला श्रीफळ म्हणून ओळखले जाते. मंदीरापासून ते घरच्या किचनमध्ये नारळाने हक्काच स्थान घेतलं आहे. नारळापासून बर्फी, लाडू, खीर असे अनेक पदार्थ तयार होतात . आता नारळाने चहाची ही जागा घेतली आहे. नारळ आरोग्याला फायदेशीर आहेच, शिवाय यात मॅग्नीशिअम,आयर्न, व्हिटॅमिन, पोटॅशिअम, फायबर असे अनेक घटक असतात. नारळाच्या चहाचा नेमका काय फायदा होतो ते जाणून घेऊया..

वजन नियंत्रणात आणण्यासाठी असा होतो फायदा :

नारळामध्ये कॅलरीज खुप असतात. शिवाय पाण्याचे प्रमाण जास्त असते. यात वजन नियंत्रीत करण्याचे गुणधर्म असतात. याचा फायदा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी नक्कीच होतो.

रोगप्रतिकार शक्ती वाढते

नारळात व्हिटॅमिन C ची मात्रा भरपूर असते. याचा फायदा रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास होतो. तज्ञांच्या सल्यानुसार इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी नारळाच्या दुधाचा चहा फायदेशीर ठरतो.

हृदयासाठी उपयुक्त

नारळ खाल्याने किंवा त्याच्या दुधापासून बनवलेला चहा पिल्याने कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदापासून बचाव होतो.

असा तयार करा चहा:

नारळाचा चहा तयार करण्यासाठी चार कप पाणी घ्या

आता यात तीन ग्रीन टी बॅग्स घाला .

1/4 कप नारळाच दूध घाला. आता 2 मोठे चमचे क्रिम घाला.

याला व्यवस्थित मिक्स करुन घ्या.

यात तुम्ही ब्राउन शुगरचा वापर ही करू शकता. झाला तुमचा चहा तयार. आता गरम गरम चहाचा आस्वाद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT