Collagen Rich Foods  esakal
लाइफस्टाइल

Collagen Rich Foods : आहारात 'या' कोलेजनयुक्त पदार्थांचा करा समावेश, वाढत्या वयाबरोबर तुमची त्वचा राहील तरूण.!

Collagen Rich Foods : आपण जसा रोजचा आहार घेतो, तसा त्याचा प्रभाव आपल्या आरोग्यावर होतो.

Monika Lonkar –Kumbhar

Collagen Rich Foods : आपण जसा रोजचा आहार घेतो, तसा त्याचा प्रभाव आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे, निरोगी आरोग्यासाठी नियमित संतुलित आहार घेणे आणि व्यायाम करणे गरजेचे आहे. जर तुमचा आहार चांगला असेल तर याचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. शिवाय, तुमचे केस आणि त्वचा यांचे ही आरोग्य चांगले राहते.

निरोगी त्वचेसाठी तुम्ही आहारात कोलेजनयुक्त खाद्यपदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे. कारण, वाढत्या वयाबरोबर त्वचेची रचना टिकवून ठेवण्यासाठी कोलेजन मोठी भूमिका बजावतो. आज आम्ही तुम्हाला काही कोलेजनयुक्त खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहोत. ज्यांचा तुम्ही आहारात समावेश करायलाच हवा. कोणते आहेत हे खाद्यपदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.

लिंबूवर्गीय फळे

आपल्या शरीरातील कोलेजनचे उत्पादन वाढवण्यासाठी डॉक्टर लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश करायला सांगतात. खरे तर उन्हाळ्यात ही फळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. परंतु, पावसाळ्यात तुम्ही या फळांचे सेवन मर्यादित प्रमाणात करायला हवे.

यासाठी तुमच्या आहारात लिंबू, संत्री, अननस, बेरी आणि किवी इत्यादी लिंबूवर्गीय फळांचा समावेश करा. या फळांमध्ये कोलेजनचे प्रमाण विपुल असते. जे तुमच्या त्वचेला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवते.

बेरीज

बेरीज खायला सगळ्यांनाच आवडते. बेरीजमध्ये स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी इत्यादी बेरीजचा समावेश असतो. या बेरीज व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहेत. शिवाय, विविध प्रकारच्या बेरी आपल्या शरीरात कोलेजनचे उत्पादन वाढवण्यास मोठी भूमिका बजावतात.

या बेरीज खायला ही स्वादिष्ट लागतात. या बेरीजचे सेवन केल्याने शरीराला मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स मिळतात आणि चिरतरूण राहण्यासाठी मदत होते.

मासे 

अनेकजण मासे चवीने खातात. प्रथिनांचा प्रमुख स्त्रोत म्हणून माशांना ओळखले जाते. माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिडचे विपुल प्रमाण आढळते. हे ओमेगा ३ फॅटी ॲसिड आपल्या त्वचेतील कोलेजन वाढवण्यास मदत करते. हे ॲसिड आपल्या शरीरात सहज शोषले जाते. अनेक संशोधनांमध्ये ही याची पृष्टी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही माशांचा आहारात समावेश करू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: जगात पुन्हा युद्धाची चाहूल? अमेरिकेवर विश्वास नाही; युद्ध भडकू शकतं, इराणचा कडक इशारा, चिंता वाढली!

Multibagger Stock: लखपतींचे करोडपती बनवणारा स्टॉक! फक्त ₹1 लाखाचे झाले तब्बल ₹1.30 कोटी

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

Junnar 12th Result: जुन्नर तालुक्यात बारावीचा निकाल ९१.४९ टक्क्यांवर; मुलींची बाजी, सात कनिष्ठ महाविद्यालये शंभर टक्के

SCROLL FOR NEXT