relationships networking life
relationships networking life esakal
लाइफस्टाइल

आपल्या सर्वांसाठी एकमेकांमधील संवाद महत्त्वाचा का असतो?

सकाऴ वृत्तसेवा

आयुष्य खूप सुंदर आहे ते मनसोक्तपणे जगून घेतलं पाहिजे.

माणसांना सगळ्या गोष्टी करता येतात. प्रत्येकाला कोणता ना कोणता आवड, छंद असतो. वाचन (Reading), लेखन (Writing), डान्स करणे (Danceing), संगीत ऐकणे (Listening to music), स्वयंपाक बनवणे, खेळणे आणि बरचं काही. तसेच आपल्या जवळच्या व्यक्तीसमोर मनमोकळेपणाने व्यक्त होणं. पण अशी एक वेळ येते जेव्हा काही कारणामुळे एकमेकांमधील संवाद (Communication) संपतो. किंवा जाणून बुजून संपवला जातो. आणि अशावेळी उरते ती फक्त तडफड. कदाचित तुम्ही ही याचा अनुभव कधी ना कधी नक्कीच घेतला असेल, बरोबर ना.

आपल्या जवळच्या प्रियजनामधील संवाद संपला की मनामध्ये तर्क वितर्क सुरु होऊन जातात. यामुळे गैरसमज (Misunderstanding) निर्माण व्हायला सुरवात होते. अशा गैरसमजामुळे न घडणाऱ्या गोष्टी ही घडायला सुरवात होतात. तसेच एकामेकांच्या मनामध्ये गैरसमज व्हायला लागतात. यामुळे वाद-भांडण होण्यास सुरवात होते. या वाद- विवादामध्ये प्रतिष्ठेची लढाई सुरु होते. अशावेळी प्रत्येकाला वाटते की, मीच बरोबर, मीच श्रेष्ठ आणि मी जे बोलते तेच खरं. या मी मी च्या नादामध्ये मनामधील मीपणाचा जय होऊन आपलेपणाचा पराभव होतो. या कारणामुळे खोटेपणा जिंकून खरेपणा हरतो. यामुळे मनातील अहंकार वाढतच जातो.

या सर्व गोष्टीमधून एकच कळून येते की, एकमेकांधील संवाद संपला की माणुसकी, नाती हे सगळंच नाहीसं होऊ लागतं. यामुळे संवादच संपून जातो. सोशल मीडिया (Social media) आणि मोबाईलमुळे (Mobile) माणसाचं आयुष्य एवढं वाढलं आहे की, समोरच्या व्यक्तीशी आपण बोलू शकत नाही. या न बोलण्याने समोरची व्यक्ती कशी आहे, तिच्या मनात आपल्याबद्दल काय भावना आहे हेच समजत नाही. आपण नेहमीच अभासी जगात जगत असतो. यामुळे आपण मनापासून खळखळून हसतही नाही. अशा गोष्टी आपल्या सोबत होऊ नयेत, यासाठी आपण नेहमी सर्वांशी मिळून मिसळून बोलले पाहिजे, होता होईल तेवढा संवाद वाढवायला हवा. आयुष्य खूप सुंदर आहे ते मनसोक्तपणे जगून घेतलं पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईने जिंकली नाणेफेक! जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेइंग ११

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT