व्यावसायिक शिक्षणात सवलत sakal
लाइफस्टाइल

व्यावसायिक शिक्षणात सवलत

तुम्ही ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी प्रवर्गातील असाल आणि तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर तुमच्या घरातील मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलत मिळणार आहे.

- मीनाक्षी गुरव

योजना

तुम्ही ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी प्रवर्गातील असाल आणि तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर तुमच्या घरातील मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलत मिळणार आहे. ही सवलत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासूनच लागू होणार आहे. त्यामुळे यंदा व्यावसायिक अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यार्थिनींना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

राज्यात उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग, कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या अधिपत्याखाली शैक्षणिक संस्थांतर्फे राबविण्यात येणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (एसईबीसी) या प्रवर्गातील आणि वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील पात्र विद्यार्थ्यांना सध्या शिक्षण व परीक्षा शुल्काच्या ५० टक्के लाभ देण्यात येतो. व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण ३६ टक्के इतके मर्यादित आहेत.

दरम्यान, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने, मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्यात; तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहून नयेत, म्हणून राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मुलींना शिक्षण व परीक्षा शुल्काच्या ५० टक्क्यांऐवजी १०० टक्के लाभ मंजूर करण्याचा निर्णय ५ जुलै रोजी घेण्यात आला. या निर्णयानुसार शिक्षण आणि परीक्षा शुल्कात १०० टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून मान्यता दिली असून त्यासंदर्भातील अध्यादेश काढण्यात आला आहे.

इथे मिळेल सवलत

  • राज्यातील शासकीय महाविद्यालये

  • शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये

  • अंशत: अनुदानित (टप्पा अनुदान) महाविद्यालये

  • कायम विनाअनुदानित महाविद्यालये

  • तंत्रनिकेतने

  • सार्वजनिक विद्यापीठे

  • शासकीय अभिमत विद्यापीठे

  • सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रम

(शब्दांकन : मीनाक्षी गुरव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT