New Year Celebration timings in different contries:
New Year Celebration timings in different contries: Esakal
लाइफस्टाइल

NEW YEAR 2022: जगाच्या कानाकोपऱ्यातील सेलिब्रेशनची वेळ एका क्लिकवर

सकाळ डिजिटल टीम

New Year 2022: नवीन वर्षाची सुरुवात व्हायला आता फक्त काही तास शिल्लक आहेत. नवीन वर्षाची सुरुवात धमाकेदार (New Year Celebration) करण्यासाठी तुम्ही सज्ज असालच, परंतु तुम्हाला हे माहिती आहे की जगभरात सर्वच देश (Country) एकाच वेळी नववर्ष साजरं करत नाहीत. जगातल्या विविध देशांची नववर्ष साजरे करण्याच्या वेळा वेगळ्या आहेत. जगातील वेगवेगळ्या ठिकाणांवरील नववर्षाच्या सेलिब्रेशनची आपण माहिती घेणार आहोत.

कोणता देश प्रथम नवीन वर्ष साजरा करतो? (Which country celebrates New Year first?)

नवीन वर्षाचे स्वागत करणारे ओशनिया Oceania हे जगातील पहिले ठिकाण (first place) आहे. टोंगा (Tonga), सामोआ (Samoa) आणि किरिबाती (Kiribati) ही लहान पॅसिफिक राष्ट्रे नवीन वर्षाचे स्वागत करणारे पहिले देश आहेत. या देशामध्ये 1 जानेवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेनुसार (GMT Greenwich Mean Time) 31 डिसेंबर रोजी सकाळी 10 किंवा भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST- Indian Standard time) दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. म्हणजेच भारतात 31 डिसेंबरच्या दुपारी 3:30 वाजताच येथे नवे वर्ष सुरु झाले असेल.

कोणता देश शेवटचे नवीन वर्ष साजरे करतो? (Which country celebrates New Year last?)

अमेरिकेजवळील हॉलंड (Howland) आणि बेकर बेटे (Baker Islands) नवीन वर्ष 2022 चे स्वागत सर्वात उशिरा करतात. 1 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता (GMT) किंवा संध्याकाळी 5:30 वाजता (IST) नवीन वर्षाचे स्वागत करतात. म्हणजेच भारतात १ जानेवारीला सायंकाळी 5:30 वाजल्या असतील तेव्हा या देशांमध्ये नवं वर्ष सुरु होतं.

जागतिक तसे भारतीय प्रमाणवेळेनुसार नवीन वर्ष 2022 सुरु होण्याची वेळ:

३१ डिसेंबर (GMT | IST नुसार)-

न्यूझीलंड: 10:15 am GMT | दुपारी 3:30 IST

ऑस्ट्रेलिया: दुपारी 1 GMT | IST संध्याकाळी 6.30 वा

जपान, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया: दुपारी ३ वाजता GMT | रात्री 8:30 IST

चीन, फिलीपिन्स आणि सिंगापूर: 4 pm GMT | रात्री 9:30 IST

बांगलादेश: 6 pm GMT | रात्री 11:30 IST

नेपाळ: 6:15 pm GMT | 11:45 IST

भारत आणि श्रीलंका: संध्याकाळी 6:30 GMT | IST 12:00 am

पाकिस्तान: संध्याकाळी 7 GMT | 12:30 IST

जर्मनी, फ्रान्स, इटली, बेल्जियम आणि स्पेन: 11 pm GMT | IST पहाटे 4:30

UK, आयर्लंड, आइसलँड, पोर्तुगाल: 12 am GMT | IST पहाटे 5:30

जागतिक तसे भारतीय प्रमाणवेळेनुसार नवीन वर्ष 2022 सुरु होण्याची वेळ:

३१ डिसेंबर (GMT | IST नुसार)-

न्यूझीलंड: 10:15 am GMT | दुपारी 3:30 IST

ऑस्ट्रेलिया: दुपारी 1 GMT | IST संध्याकाळी 6.30 वा

जपान, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया: दुपारी ३ वाजता GMT | रात्री 8:30 IST

चीन, फिलीपिन्स आणि सिंगापूर: 4 pm GMT | रात्री 9:30 IST

बांगलादेश: 6 pm GMT | रात्री 11:30 IST

नेपाळ: 6:15 pm GMT | 11:45 IST

भारत आणि श्रीलंका: संध्याकाळी 6:30 GMT | IST 12:00 am

पाकिस्तान: संध्याकाळी 7 GMT | 12:30 IST

जर्मनी, फ्रान्स, इटली, बेल्जियम आणि स्पेन: 11 pm GMT | IST पहाटे 4:30

UK, आयर्लंड, आइसलँड, पोर्तुगाल: 12 am GMT | IST पहाटे 5:30

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT